जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीविरोधात शिवसेना आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:17 IST2021-05-26T04:17:51+5:302021-05-26T04:17:51+5:30

केंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून पेट्रोल, डिझेल, गॅस व जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ सतत सुरूच आहे. यामुळे तेल, डाळी ...

Shiv Sena is aggressive against the rise in prices of essential commodities | जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीविरोधात शिवसेना आक्रमक

जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीविरोधात शिवसेना आक्रमक

केंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून पेट्रोल, डिझेल, गॅस व जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ सतत सुरूच आहे. यामुळे तेल, डाळी आदी वस्तूंच्या दरवाढीमुळे महागाई प्रचंड वाढलेली आहे. सर्वसामान्य माणसाला जगावं की मरावं, असा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढीने शंभरी गाठली असल्याचे निवेदनात म्हटले असून, जनतेला स्वस्त व मुबलक जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे हे केंद्र सरकारचे कर्तव्य आहे. मात्र, जनता महागाईमुळे होरपळून निघत असल्याचे सांगत, पेट्रोल, डिझेल, गॅस, तेल व डाळींची दरवाढ तातडीने मागे घ्यावी, महागाईला आळा घालावा, अन्यथा पाचोरा तालुका सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला असून, यावेळी शिवसेना शहरप्रमुख किशोर बारावकर, मुकुंद अण्णा बिलदीकर, प्रवीण ब्राह्मणे, हरिभाऊ पाटील, रवींद्र मराठे, टिल्लू आप्पा, विजय भोई यांच्यासह शिवसेना महिला आघाडीच्या मंदा पाटील, सुनंदा महाजन, उर्मिला शेळके, किरण पाटील, रेखा राजपूत, स्मिता बारवकर यांची उपस्थिती होती.

यावेळी मुकुंद अण्णा बिलदीकर, शहर प्रमुख किशोर बारावकर, प्रवीण ब्राह्मणे, नगरपालिका कर्मचारी प्रकाश पवार यांची उपस्थिती होती.

भूमी अभिलेख कार्यालयातही शिवसेनेची धडक

दरम्यान, दरवाढ विरोधातील आंदोलनानंतर शिवसेनेचे मुकुंद अण्णा बिलदीकर यांच्या नेतृत्वात पदाधिकाऱ्यांनी भूमी अभिलेख कार्यालयात उपअधीक्षक भोये यांची भेट घेत, शहर भूमापक स्वर्गीय कुलकर्णी यांच्या रिक्त जागेवर अद्याप कोणाचीही नियुक्ती न झाल्याने नाराजी व्यक्त करत, तातडीने या पदाचा कार्यभार स्वतंत्र कर्मचाऱ्यांना द्यावा. जनतेची कामे रेंगाळू देऊ नका, अशी आग्रही मागणी केली, अन्यथा आम्हाला शिवसेना स्टाईल आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला, तसेच पाचोरा शहरातील सुमारे ३,५०० अतिक्रमित घरे नावावर करण्यासंदर्भात सुरू असलेली प्रक्रिया संथ गतीने का सुरू आहे, असा जाब अधीक्षक भोये यांना विचारला. दरम्यान, कोरोना परिस्थितीमुळे शासन आदेशामुळे काम थांबले असल्याचे त्यांनी सांगत, शासनाचा पुढील आदेश आल्यास मोजणीचे काम तत्काळ पूर्ण करू, असे आश्वासन त्यांनी दिले.

Web Title: Shiv Sena is aggressive against the rise in prices of essential commodities