शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

‘ती’ने लग्नाला नकार दिला, त्याने बंदुकीने मारण्याची धमकी दिली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:17 IST

जळगाव : लग्नास नकार दिल्याच्या रागातून सचिन त्र्यंबक जाधव (रा.हिंजवडी, पुणे) या तरुणाने एमबीए झालेल्या तरुणीचे फोटो सोशल मीडियावर ...

जळगाव : लग्नास नकार दिल्याच्या रागातून सचिन त्र्यंबक जाधव (रा.हिंजवडी, पुणे) या तरुणाने एमबीए झालेल्या तरुणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यासह बंदुकीने उडवून देण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सचिन याच्याविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी २३ वर्षीय तरूणीचे शिक्षण एमबीए झाले आहे. पुण्यात शिक्षण घेत असताना सचिन त्र्यंबक जाधव या तरूणाशी २०१९ मध्ये ओळख झाली. मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाल्याने सचिन जाधव याचे तरुणीशी सतत बोलणे होत असे. तिने कुटुंबाशीही ओळख करुन दिली होती. सचिन याची परिस्थिती गरीबीची असल्यामुळे त्याला वेळोवेळी तरुणी व तिच्या वडिलांनी मदत केली. त्यातून सचिन हा तिच्याशी एकतर्फी प्रेम करु लागला. ३१ डिसेंबर २०१९ रोजी अचानक घरी बोलावून लग्नाचा प्रस्ताव ठेवला. त्यास तिने नकार दिला. त्याचा राग आल्याने सचिनने सतत तरुणीला त्रास देणे सुरु केले. सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्यापासून तर तिच्यावर लक्ष ठेवू लागला. लॉकडाऊनमुळे तरुणी जळगावला घरी आली असता १७ जुलै रोजी सचिन देखील ‌थेट तरुणीच्या घरी आला. तु माझा फोन का घेत नाही. मला प्रतिसाद का देत नाही. पुढच्यावेळी जर माझ्याशी बोलली नाही किंवा फोन घेतला नाही तर बंदुक घेऊन येईल व तुला मारुन टाकेल अशी धमकी दिली. लग्नाला नकार दिल्यानेच सचिन धमकी देत असल्याचे तरुणीने फिर्यादीत नमूद केले आहे.