शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

कौस्तुभला पाहताच आईने मारली मिठी

By admin | Updated: December 5, 2014 15:04 IST

कौस्तुभ अग्निहोत्री या तरुण अभियंत्याची अंगोलाहून ३ रोजीसुटका झाली. भुसावळला तो परतताच त्याच्या कुटुंबीयांना आनंदाश्रू आवरणे कठीण झाले होते.

भुसावळ : कंपन्यांमधील मतभेदामुळे अपॅक मरीन्स कंपनीच्या जहाजावरील कर्मचार्‍यांना ओलीस ठेवण्यात आले होते. त्यात भुसावळच्या तरुणाचाही समावेश होता. महसूलमंत्री एकनाथराव खडसे व खासदार रक्षा खडसे, ललित चौधरी यांच्या प्रयत्नांमुळे कौस्तुभ अग्निहोत्री या तरुण अभियंत्याची अंगोलाहून ३ रोजीसुटका झाली. भुसावळला तो परतताच त्याच्या कुटुंबीयांना आनंदाश्रू आवरणे कठीण झाले होते.

कौस्तुभ हा जहाजावर ऑईलर म्हणून नियुक्तीस होता. जहाज लुआंडा (अंगोला) येथे पोहोचल्यानंतर सात भारतीय, चार इंडोनेशियन व पाकिस्तानी कर्मचार्‍यांना बंदी बनविण्यात आले होते. नोहा व अन्य एका कंपनीच्या मालकी हक्कावरून सुरू असलेल्या वादामुळे कर्मचार्‍यांना बंदी बनविण्यात आल्याने हा प्रकार घडला होता. लोकप्रतिनिधींनी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्कसाधल्याने भारत सरकारने सुटकेसाठी प्रयत्न केला. कौस्तुभची सुटकाझाली; मात्र अन्य भारतीय व कर्मचार्‍यांना अद्यापही बंदी म्हणून ठेवण्यात आल्याचे कौस्तुभने सांगितले. ९ जुलै २0१४ ते ३ डिसेंबरपर्यंत बंदी म्हणून ठेवण्यात आल्याचे तो म्हणाला. त्याचे वडील रेवतीप्रसाद अग्निहोत्री येथील रेल्वेच्या पीओएचमध्ये फिटर म्हणून सेवेत आहेत, तर आई सविता अग्निहोत्री जिल्हा रुग्णालयात डोळ्यांच्या विभागात प्रमुख परिचारिका आहेत. पत्नी माधवी गृहिणी आहेत. 
कौस्तुभला दोन महिन्यांपूर्वी पुत्ररत्न प्राप्त झाले असून त्याचे नामकरण राहिले होते. तो आल्याने हा सोहळादेखील लवकरच होणार असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. 
लोकमतचे आभार 
■ कौस्तुभला ओलीस ठेवल्याबद्दल लोकमतने सविस्तर वृत्त प्रसिद्धकरून शासन व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले होते. या वृत्ताबद्दल कौस्तुभची आई सविता अग्निहोत्री यांनी तोंडभरून कौतुक केले. लोकमतमुळे न्याय मिळाला, मुलगा घरी आला, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.