शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्तांसाठी धावल्या सेवाभावी संस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 00:51 IST

अमळनेर तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावल्या सेवाभावी संस्था धावल्या

ठळक मुद्देअमळनेर तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावल्या सेवाभावी संस्थाखाद्यपदार्थ, कपडे आणि शैक्षणिक साहित्याच्या रूपाने दिला मदतीचा हात

संजय पाटीलअमळनेर, जि.जळगाव : कोल्हापूर आणि सांगली पाठोपाठ जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यामधील मुडी या परिसरामध्ये पूर आला होता. यात मुडी गावातील तसेच परिसरातील गावांतील काही गरीब परिवारांना या पुराची झळ पोहोचली. या पुरामध्ये पांझरा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या गरिबांचे संसार उद्ध्वस्त झाल्याचे चित्र समोर आले. या पार्श्वभूमीवर या परिवारांना मदतीचा हात म्हणून माणुसकी सेवा फाउंडेशन, वसंत लीला वुमेन्स वेलफेअर अ‍ॅण्ड कल्चरल असोसिएशन, द युनिक इव्हेंट, प्रमिलाबेन मणीलाल गाला ट्रस्ट आणि अनुपम स्टेशनरी या सेवाभावी संस्थांच्या वतीने खाद्यपदार्थ, कपडे आणि शैक्षणिक साहित्य देण्यात आले.मुडी या गावातील परिवारासह बोदर्डे आणि चोंदे या परिसरातील गावातील पूरग्रस्त परिवारातील महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या, तर पुरुषांना आणि लहान मुलांना कपडे देण्यात आले. त्याचबरोबर या परिवारांना खाद्यपदार्थांची पाकिटेसुद्धा देण्यात आली. तसेच शैक्षणिक साहित्य देण्यात आले. यात प्रत्येक परिवाराला या सेवाभावी संस्थांच्या वतीने मदतीचा हात देण्यात आला.पुरामध्ये सर्वस्व वाहून गेलेल्या संसार उघड्यावर पडलेल्या या आदिवासी कुटुंबीयांना या मदतीतून हातभार मिळाला आहे. यासाठी प्रमिला बेन मणीलाल ट्रस्टचे संचालक मणिभाई गाला, अनुपम स्टेशनरीचे संचालक रमणीक भाई गाला, त्याचप्रमाणे युनिक इव्हेंटचे संचालक अमेय नेवे, वसंत लीला वुमेन्स वेल्फेअर अ‍ॅण्ड कल्चरल असोसिएशनच्या मनीषा कोल्हे असोदेकर, माणुसकी सेवा फाउंडेशनच्या अध्यक्षा शुभदा नेवे, बिजली ट्रेडर्सचे श्रीकांत मुंदडा, अमळनेर येथील महेंद्र पाटील, गुणवंत पाटील, संजय पाटील, शारंगधर देशमुख महाराज, वसंतराव पाटील, मंदाकिनी यांचे सहकार्य लाभले.

टॅग्स :RainपाऊसAmalnerअमळनेर