शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अपंग अनुशेषासाठी सुधारित जाहिरात काढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 11:58 IST

जळगाव : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरतीमध्ये दिव्यांगांना नियमानुसार ४ टक्के आरक्षण न ठेवल्याने या संदर्भात सक्षम न्यायाधिकारी ...

जळगाव : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरतीमध्ये दिव्यांगांना नियमानुसार ४ टक्के आरक्षण न ठेवल्याने या संदर्भात सक्षम न्यायाधिकारी तथा दिव्यांग कल्याण न्यायाधिकरणाच्या आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे. त्याची दखल घेत दिव्यांग कल्याण न्यायाधिकरणाच्या आयुक्तांनी सुधारीत जाहिरात काढण्याचे आदेश जिल्हा बँकेला दिले आहे.जिल्हा बँकेच्यावतीने कारकून या पदासाठी २२० पदांची भरती करण्यात येणार असून त्यासाठी १ आॅगस्ट २०१९ रोजी बँकेच्यावतीने जाहिरात काढण्यात आली. मात्र यामध्ये दिव्यांगांसाठी असलेले ४ टक्के आरक्षण ठेवण्यात आलेले नाही.या संदर्भात ठाणे येथील प्रहार अपंग क्रांती संस्थेच्यावतीने सक्षम न्यायाधिकारी तथा दिव्यांग कल्याण न्यायाधिकरणाच्या आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली. त्यात म्हटले आहे की, दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६मधील कलम ३४ (१)नुसार दिव्यांगाकरिता सरकारी नोकर भरतीमध्ये ४ टक्के आरक्षण असताना जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्यावतीने सदर नोकर भरतीसाठी ४ टक्के आरक्षणच ठेवलेले नाही.या तक्रारीची दखल घेत सक्षम न्यायाधिकारी तथा दिव्यांग कल्याण न्यायाधिकरणाच्या आयुक्तांनी जिल्हा बँकेच्या कार्यकारी संचालकांना पत्र देऊन अपंगांचा अनुशेष भरण्याच्या दृष्टीने तत्काळ सुधारीत जाहिरात काढावी, असे आदेश दिले आहे.या आदेशाची प्रत राज्याच्या सहकार आयुक्तांना देण्यात आली आहे.दरम्यान, ही भरती करताना त्यावर सहकार सचिवांचे नियंत्रण असते. त्यांच्या सूचनेनुसारच जाहिरात काढण्यात आल्याचे बँकेच्या सूत्रांनी सांगितले.त्यामुळे आता बँकेचे कार्यकारी संचालक निर्णय घेतात की सहकार सचिवांकडून नवीन आदेश येतात, या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJalgaonजळगाव