शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बाधित वृद्धाच्या मृत्यूनंतर नातेवाईक संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 12:41 IST

कोविड रुग्णालय : डॉक्टरवर हलगर्जीपणाचा आरोप, अंत्यसंस्कार न करण्याची भूमिका

जळगाव : शिवाजीनगरातील नीळकंठ दयाराम पाटील या ६५ वर्षीय कोरोनाबाधितवृद्धाचा मंगळवारी सायंकाळी मृत्यू झाल्याने रुग्णालयात नातेवाईक संतप्त झाले. गेल्या तीन दिवसांपासून त्यांना अतिदक्षता विभागाची गरज असतानाही त्यांना सामान्य कक्षातून हलविण्यात आले नाही, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हा जीव गेल्याचा आरोप नातेवाईकांनी करीत संताप व्यक्त केला.रात्री आठ वाजेच्या सुमारास रुग्णालय आवारात गर्दी झाली होती़ अधिष्ठातांची भेट घेतल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली होती़-नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार शिवाजीनगरातील नीळकंठ पाटील यांना बारा दिवसांपूर्वी कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ कोविड रुग्णालयातील ९ नंबर कक्षात ते दाखल होते़ त्यांची आॅक्सिजन पातळी खालावली होती़ तीन दिवसांपूर्वी वरिष्ठ डॉक्टर्सनी ज्युनिअर डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांना त्यांना अतिदक्षता विभागात हलविण्याच्या सूचना दिल्या होत्या़ मात्र, संबंधित कर्मचारी व डॉक्टर्सनी त्यांना अतिदक्षता विभागात हलविले नाही व मंगळवारी सायंकाळी साडे सहा वाजता थेट मृत्यू झाल्याची माहिती नातेवाईकांना देण्यात आली़ दरम्यान, या बाबीमुळे संतप्त होत नातेवाईक तसेच छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष पाटील, भगवान सोनवणे यांच्यासह पदाधिकारी तसेच धर्मरथ फाऊंडेशनचे विनायक पाटील व कार्यकर्ते यांनी रुग्णालय आवारात येऊन डॉक्टर्सला जाब विचारला़-संतोष पाटील यांनी सुरक्षा रक्षकांवरही संताप व्यक्त केला़ तोंड बघून वाहने आत सोडली जातात असा आरोप त्यांनी केला दुपारी व्हाआयपींची वाहने लागलेली अस तात, याबाबतही त्यांनी विचारणा केली़-वैद्यकीय अधीक्षक डॉ़ दत्तात्रय बिराजदार यांनी येऊन बाजू ऐकून घेतली़ अधिष्ठाता न आल्याने उ पस्थितांनी संताप व्यक्त केला़ डॉक्टर्सच्या हलर्गीपणामुळे रुग्णांचा मृत्यू होत असल्याचा आरोप केला़ शिवाय या आधीही सांगूनही एक मृ त्यू झाल्याचा आरोपही करण्यात आला़ अखेर अधिष्ठाता यांची भेट घेतल्याशिवाय अंत्यसंस्कार न करण्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली़ संबधित मृत वृद्धांचे वडिल हे माजी नगराध्यक्ष होते़-मयताचे नातेवाईक स्मशानभूमीमध्ये गेले असता तेथेही ओट्यासाठी पैशाची मागणी करण्यात आल्याचा आरोपही नातेवाईकांतर्फे करण्यात आला.दोन वेळा स्वच्छतागृहात पडलेनीळकंठ पाटील हे बाधित वृद्ध रुग्णालयातून स्वच्छतागृहात जात असताना दोन वेळा खाली पडले होते़ मात्र, त्या ठिकाणी लक्ष द्यायला कोणीही तयार नव्हते़ जर अतिदक्षता विभागात बेड उपलब्ध नव्हता तर रुग्णालयाने तशी माहिती देणे गरजेचे होते़ आम्ही खासगी रुग्णालयात रुग्णाला हलविले असते. मात्र, रुग्णालयाने तसे केले नाही, असे नातेवाईकांचे म्हणणे होते़संबंधित बाधित रुग्णांवर बारा दिवस उपचार सुरू होते़ त्यांची प्रकृती ठिक होती़ रुग्णालयात सेंट्रल आॅकिसजन सिस्टीम असल्याने आॅक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित होता़ अतिदक्षता विभागात बेड खाली नव्हते़ त्यांचा अचानक मृत्यू झाला़ हृदयस्रायूमध्ये रक्ताची गाठ झाल्याने असा अचानक मृत्यू होऊ शकतो़- डॉ़ दत्तात्रय बिराजदार, वैद्यकीय अधीक्षकउपचार होत नव्हते तर रुग्णालयाने तसे सांगायला हवे होते़ आता कितीही तक्रारी केल्या तरी माझे वडिल काही परत येणार नाही़ वडिलांना श्वास घ्यायला अडचणी होती, त्यांन जेवणही करता येत नव्हते, आम्ही वारंवार डॉक्टरला सांगत होतो़ मात्र, दुर्लक्ष झाले़ अतिदक्षता विभागात हलविण्याची मागणीही केली़ मात्र, ते ठीक आहेत केवळ विकनेस आहेत,अशी उत्तरे मिळायची आणी आज थेट दुपारी तब्ब्येत बिघडली व मृत्यू झाल्याचा निरोप आला़ नुसत्या विकनेसने मृत्यू होतो का?- निशांत पाटील, मयताचा मुलगा

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव