प्रजापतनगरात रस्त्यावरच घाणीचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:18 IST2021-09-27T04:18:19+5:302021-09-27T04:18:19+5:30

रस्ता गेला खड्ड्यात जळगाव - शहरातील अत्यंत वर्दळीच्या अशा चौबे शाळा शनिमंदिर रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, खड्ड्यांमुळे वाहनधारक ...

The realm of dirt on the streets in Prajapatnagar | प्रजापतनगरात रस्त्यावरच घाणीचे साम्राज्य

प्रजापतनगरात रस्त्यावरच घाणीचे साम्राज्य

रस्ता गेला खड्ड्यात

जळगाव - शहरातील अत्यंत वर्दळीच्या अशा चौबे शाळा शनिमंदिर रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, खड्ड्यांमुळे वाहनधारक हैराण झाले आहे. रस्त्याची अक्षरश: चाळण झालेली आहे. या परिसरात बाजार भरत असल्याने मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. यासह शिवाजीनगर परिसरातील नागरिक, यावल, चोपडा येथे प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने महापालिकेविरोधात रोष वाढला आहे.

पावसामुळे जनजीवन विस्कळीत

ममुराबाद : सततच्या रिमझिम पावसामुळे ममुराबाद परिसरात जनजीवन विस्कळीत झाले असून, शेतीची कामे खोळंबली आहेत. पावसामुळे कामे सोडून मजूर वर्गाला घरी परतावे लागत असल्याचे चित्र आहे. गेल्या अनेक दिवसांपासून परिसरात पावसाची रिमझिम सुरू आहे. कापूस, सोयाबीन, उडीद, मूग, तीळ या पिकांचे नुकसान होण्याची परिस्थिती असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

Web Title: The realm of dirt on the streets in Prajapatnagar