राम राम.... देवा... कसं कायं चाललंय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 07:29 PM2019-11-09T19:29:14+5:302019-11-09T19:29:28+5:30

अरविंद इनामदार यांचा जळगावशी ऋणानुबंध: गोड तेवढाच करारी आवाज हरपला

 Ram Ram .... God ... how are you doing ... | राम राम.... देवा... कसं कायं चाललंय...

राम राम.... देवा... कसं कायं चाललंय...

Next

जळगाव : आपला सहज आणि सरळ स्वभाव आणि भेटणाऱ्या व्यक्तीला काय देवा कसे काय... राम राम... असे म्हणत आपलेसे करणारे अरविंद इनामदार यांचे जळगावशी जुने आणि तेवढेच स्रेहाचे ऋणानुबंध राहिले आहेत.
अरविंद इनामदार (७९) यांचे शुक्रवारी पहाटे मुंबईत निधन झाले. या पार्श्वभूमीवर त्यांच्या जळगावशी असलेल्या आठवणींना उजाळा मिळाला.

-प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून त्यांची ख्याती होती. पोलीस दलातील अयोग्य आणि चुकीच्या गोष्टींवर सतत ते प्रहार करीत. लेखक आणि फर्डे वक्ते म्हणूनही ते प्रसिद्ध होते.
-गेल्या दोन वर्षापूर्वी व. वा. जिल्हा वाचनालयाच्या नवीन सभागृहाचे उद्घाटन कार्यक्रमास त्यांची विशेष उपस्थिती होती.
-जळगावातील गाजलेल्या सेक्स स्कॅन्डल प्रकरणाचा तपास त्यांच्यासह मीरा बोरवणकर आणि तत्कालीन पोलीस अधीक्षक दीपक जोग यांच्याकडे होता. या प्रकरणाचा यशस्वी तपास त्यांनी केला. त्यामुळेच यातील मुख्य आरोपी पंडित सपकाळे याच्यापर्यंत पोलिसांना पोहचता आले.
-जळगावात झालेल्या अनेक कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती दिली आहे. सन अभाविप ३८ वे प्रदेश अधिवेशन दि. २८,२९ व ३० नोव्हेंबर २००३ असे तीन दिवस जळगावच्या शिवतीर्थ मैदानावर झाले होते. या अधिवेशनाचे उद्घाटक म्हणून इनामदार हे उपस्थित होते.
४जळगाव येथील उद्योजक श्रीकांत मणियार यांच्याकडील अनेक कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली आहे. दोन वर्षापूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी वाढदिवसाचे एक गाणेही म्हटले होते. याचे शहरातील अनेक जण साक्षीदार आहेत.
४दोन वर्षापूर्वीच्या जळगाव भेटीत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातील ‘लोकमत‘ शहर कार्यालयासही भेट दिली होती. त्यावेळी गप्पांचा फड चांगलाच रंगला होता. या दिलखुलास संवादात पोलिसांविषयी त्यांची आत्मीयता आणि जवळीकता क्षणोक्षणी जाणवत होती.

Web Title:  Ram Ram .... God ... how are you doing ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.