शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेत प्रवाशांना लुटणा:या टोळीला पकडले

By admin | Updated: March 17, 2017 00:30 IST

दरोडय़ाचा गुन्हा दाखल : चाकू, मिरची पूड हस्तगत; शहरात दरोडय़ाचे नियोजन

जळगाव : रेल्वेत प्रवाशांशी दादागिरी करून त्यांच्याजवळील मोबाईल व रोकड लुटणा:या टोळीतील चार जणांना पकडण्यात शहर पोलिसांच्या पथकाला यश आले असून त्यातील दोन जण फरार झाले आहेत. दरम्यान, पकडलेल्या चौघांच्या बॅगेत मिरची पूड, चाकू व दोर असे साहित्य आढळून आले. दरोडा टाकण्याच्या उद्देशानेच ही टोळी फिरत होती. दरम्यान, त्यांच्याविरुध्द दरोडय़ाचा प्रय} केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुरत-भसावळ या पॅसेंजरमध्ये सहा ते सात जणांची टोळी असून ती प्रवाशांशी दादागिरी करुन मोबाईल हिसकावत असल्याची माहिती शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रदीप ठाकूर यांना मिळाली होती. त्यानुसार ठाकूर यांनी सहायक निरीक्षक दीपक गंधाले, सहायक फौजदार वासुदेव सोनवणे, नवजीत चौधरी, प्रितम पाटील, दुष्यंत खैरनार, संजय भालेराव, अमोल विसपुते व गणेश शिरसाळे यांचे पथक रेल्वे स्टेशनच्या आउटरला पाठविले. सकाळी आठ वाजता या पथकाने सापळा लावला होता. मात्र ही टोळी त्या जागेवर नाही तर हॉटेल निसर्गच्या पाठीमागे थांबल्याची माहिती गंधाले यांना मिळाली. त्यामुळे हे पथक तेथे आले असता पोलीस पाहताच त्यांनी पळ काढला. चौघे जाळ्यात, दोन फरारपाठलाग करत असताना पोलिसांनी शेख कदीर शेख इब्राहीम (वय 20) वसीम शेख अजीज (वय 21) व दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. गणेश शिरसाळे व नवजीत चौधरी या पोलिसांनी बारीक गल्लीतून दोघांचा पाठलाग केला, मात्र ते निसटण्यात यशस्वी झाले. ताब्यात घेतलेल्या चौघांना पोलीस स्टेशनला आणले असता त्यांच्या बॅगेत मिरची पूड, चाकू, दोर तसेच एक सीम कार्ड नसलेला मोबाईल आढळून आला. या टोळीकडून शहरात जबरी चोरी किंवा दरोडा टाकण्याचे नियोजन होते. दरम्यान, अल्पवयीन मुलांची बालनिरीक्षण गृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती शहर पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक दीपक गंधाले यांनी दिली.

 

अमळनेरच्या भावंडाशी झाली झटापटपोलिसांनी पकडलेल्या टोळीने लक्ष्मण पोलाद कोळी व रमेश कोळी (रा.अमळनेर)या दोन भावंडाशी झटापट झाली होती.दोन्ही भाऊ हे  सकाळी 7.30 वाजता अमळनेर येथे गाडीत चढताना चोरटय़ाने त्यांच्या खिशातील मोबाईल चोरुन लांबवून पळ काढण्याचा प्रय} केला. चोरटय़ाच्या हातातून कोळी यांनी मोबाईल हिसकावण्याचा प्रय} केला असता त्यांनी गाडीतून फेकून देण्याची धमकी दिली. या दोघ भावांनी घडलेला प्रकार जळगाव येथील त्यांच्या नातेवाईकांना सांगितला.जळगावला आल्यावर शुभम रघुनाथ तायडे, मुन्ना संतोष सोनवणे, सुनील दुर्योधन सैंदाणे, भगवान काशीनाथ सोनवणे यांनी कोळी भावंडाना धीर देत 4 चोरटय़ांना पकडले, त्यावेळी त्यांच्यात बाचाबाची झाली. अन्य दोन जण फरार होण्यात यशस्वी झाले. नंतर या चोरटय़ांना शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेबाबत सहायक पोलीस निरीक्षक दीपक गंधाले यांना विचारले असता आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती, त्यानुसार चोरटय़ांना आम्ही पकडले. त्यांचा रेल्वेत कोणाशी वाद झाला हे माहिती नसल्याचे स्पष्टीकरण दिले.