दूध संघाचे वाहन ढकलत दरवाजासमोर आणले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:20 IST2021-07-07T04:20:53+5:302021-07-07T04:20:53+5:30

एकाच्या खांद्यावर उभे राहून दुसऱ्याने तोडले सीसीटीव्ही जिल्हा मार्केटींग फेडरेशनच्या कार्यालयाच्या समोरच्या बाजूने दोन सीसीटीव्ही लावलेले होते. हात पुरत ...

Pushing the milk team's vehicle, he brought it in front of the door | दूध संघाचे वाहन ढकलत दरवाजासमोर आणले

दूध संघाचे वाहन ढकलत दरवाजासमोर आणले

एकाच्या खांद्यावर उभे राहून दुसऱ्याने तोडले सीसीटीव्ही

जिल्हा मार्केटींग फेडरेशनच्या कार्यालयाच्या समोरच्या बाजूने दोन सीसीटीव्ही लावलेले होते. हात पुरत नसल्याने एक चोरटा दुसऱ्या चोरट्याच्या खांद्यावर चढला व त्याने एक सीसीटीव्ही तोडला. तर तिजोरी बाहेर घेऊन जाण्यापूर्वी चोरट्याने दुसऱ्या बाजूच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद होऊ नये म्हणून कॅमेरा दुसऱ्या दिशेने वाकविला. आतमध्ये तिजोरी घेतल्यावर डीव्हीआर बॉक्स समजून चोरट्यांनी दोन इंटरनेटचे राऊटर व युनिट मशीन उचलून नेले; मात्र डीव्हीआर बॉक्स हा दुसऱ्या खोलीत असल्याने तो सुरक्षित राहिला. त्यामुळे चोरट्यांचा सर्व प्रताप सीसीटीव्हीत कैद झाला.

सहा महिन्यांपूर्वीही झाली होती चोरी

या कार्यालयात गेल्या सहा महिन्यांपूर्वीही चोरी झाली होती. यावेळी चोरटे कार्यालयाच्या मागील बाजूने कारने आले होते; मात्र त्यावेळी चोरट्यांना केवळ अडीच हजारांची रोकड हाती लागली होती. रक्कम कमी असल्याने तेव्हा संस्थेने पोलिसात तक्रार देणे टाळले होते.

३० मिनिटे चोरटे संस्थेच्या कार्यालयात

पहाटे ३ वाजून ४५ मिनिटांनी चोरटे विसनजी नगरात आले. होमगार्डच्या कार्यालयासमोर कार उभी केली. ३ वाजून ४६ मिनिटांनी सुरुवातीला एक चोरटा कार्यालयाकडे आला. ३.५८ वाजता फेडरेशनच्या दरवाजाचे बाहेरचे कुलूप कडी कोयंडा तोडून चोरटे आतमध्ये शिरले. त्यानंतर तिजोरी घेऊन ४ वाजून १० मिनिटांनी बाहेर आले. ४.१५ मिनिटांनी तिजोरी कारमध्ये टाकून चोरटे पसार झाले.

Web Title: Pushing the milk team's vehicle, he brought it in front of the door