बेपत्ता बालशौर्य पुरस्कार विजेत्या नीलेशच्या विरहात आजीने सोडले प्राण

By Admin | Updated: June 14, 2017 16:33 IST2017-06-14T16:33:39+5:302017-06-14T16:33:39+5:30

या दोन्ही नातवांचा तपास नसल्याने त्यांच्या विरहाच्या दु:खाने नीलेशच्या आजीचे निधन झाले

Pran, who left the granddaughter of the missing child's awardee, Nilesh | बेपत्ता बालशौर्य पुरस्कार विजेत्या नीलेशच्या विरहात आजीने सोडले प्राण

बेपत्ता बालशौर्य पुरस्कार विजेत्या नीलेशच्या विरहात आजीने सोडले प्राण

ऑनलाईन लोकमत

मुक्ताईनगर, जि. जळगाव, दि. 14 - बालशौर्य पुरस्कार विजेता नीलेश भिल्ल व त्याचा भाऊ  गंगाराम बेपत्ता होऊन महिना उलटला तरी या दोन्ही नातवांचा तपास नसल्याने त्यांच्या विरहाच्या दु:खाने नीलेशच्या  आजीचे निधन झाले. 
आजीच्या अंत्यसंस्कारास आलेल्या नातेवाईकांनामध्ये वृद्धेच्या निधनाच्या दु:खाला समतोल अशी या बालकांची चिंता उमटून आली. मुले परत येतील हाच धीर आज नीलेशच्या आईबाबांना आप्तेष्ट देत होते. 
बालशौर्य पुरस्कार विजेता नीलेश रेवराम भिल्ल  व त्याचा भाऊ गंगाराम ( रा. कोथळी ता. मुक्ताईनगर) ही बालके 18 मे पासून बेपत्ता आहे.  त्यांचा सर्वत्र शोध सुरू असतना वृद्ध त्याची आजी अलिशाबाई झोपू भिल्ल हीदेखील सतत  8 दिवस पायपीट करीत पंचक्रोशीत नातवांचा शोध घेत होती. घरातील आठराविश्व दारिद्रने खाण्याची सोय नसताना आजींची धावपळ आजरपण घेऊन आली. 10 दिवसांपासून खाटेवर खिळलेल्या अलिशाबाईने शेवटी मंगळवारी रात्री  नातवांच्या विरहात प्राण सोडले.  अंत्यसंस्कारास आलेल्या नातेवाईकांमध्ये नीलेश व त्याच्या भावाच्या बेपत्ता होण्याची चिंता व शोध घेण्यासाठीचे प्रय} या वाबत काळजी व्यक्त केली जात होती.

Web Title: Pran, who left the granddaughter of the missing child's awardee, Nilesh