तब्बल 24 तासांनंतर वीजपुरवठा सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 11:11 PM2021-06-24T23:11:22+5:302021-06-24T23:13:36+5:30

रेल्वे उड्डाणपुलाजवळ टाकण्यात आलेली ३३ के.व्ही. केबल किट जळाल्यामुळे २४ तासापासून खंडित झालेला वीजपुरवठा गुरुवारी सुरळीत झाला.

Power supply restored after 24 hours | तब्बल 24 तासांनंतर वीजपुरवठा सुरळीत

तब्बल 24 तासांनंतर वीजपुरवठा सुरळीत

googlenewsNext
ठळक मुद्देभुसावळकरांनी सोडला सुटकेचा नि:श्वासचौपदरीकरणात अंडर ग्राऊंड केबलमध्ये झाला होता बिघाड

लोकमत न्यूज नेटवर्क

भुसावळ  : महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असून रेल्वे उड्डाणपुलाजवळ टाकण्यात आलेली ३३ के.व्ही. केबल किट जळाल्यामुळे २४ तासापासून खंडित झालेला वीजपुरवठा गुरुवारी सुरळीत झाला. यामुळे अंधारात चाचपडत असलेल्या निम्मे भुसावळवासीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

 महामार्गाचे काम सुरू असून खेडी  १३२ उपकेंद्रावरून तापी नगर केंद्राला वीज जोडणी करणार्‍या अंडर  ग्राउंड ३३ के.व्ही. टेबल किट २३ रोजी सकाळी अकराला जळाली. याचा परिणाम शहराच्या वीजपुरवठ्यावर झाला. यामुळे अर्धे भुसावळकर हे अंधारात होते. 

दुरुस्तीसाठी जळगावहून विशेष पथक

 दुरुस्तीसाठी जळगाव येथून विशेष पथक बोलावण्यात  आल्यानंतर  अथक परिश्रम केल्याने १७७ मीटर ३३ के.व्ही.ची नवीन केबल टाकल्यानंतर अखेर २४ रोजी दुपारी दुपारच्या सुमारास गेल्या २४ तासापासून खंडित असलेला वीजपुरवठा सुरळीत झाला. 

तात्पुरत्या स्वरूपात वीजजोडणी 

दरम्यान, खंडित पुरवठा तात्पुरत्या स्वरूपात सुरळीत करण्यासाठी साकेगाववरून वीज जोडणी  करण्यात आली होती. विद्युत वितरण कंपनीचे  कार्यकारी अभियंता पी.आर.घोरूडे, विभागीय अभियंता रवींद्र पद्मे व लाईनमनसह कर्मचाऱ्यांचा फौजफाटा जळालेली केबल बदलण्यासाठी घटनास्थळी   युद्धपातळीवर कार्य करून वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतरच त्यांनी सुटकेचा नि:श्वास घेतला.

दुष्काळात तेरावा महिना

शहरात तापी पात्रामध्ये मुबलक पाणी असूनसुद्धा शहरवासीयांचा घसा कोरडाच आहे. कधी जीर्ण जलवाहिनी लिकेज होते, तर कधी ट्रांसफार्मरमध्ये बिघाड होतो, तर कधी महामार्ग चौपदरीकरणाच्या कार्यात नको त्या ठिकाणी जलवाहिनी फुटते. अशा अनेक कारणांमुळे शहराला होणारा पाणीपुरवठा रोटेशननुसार एक ते दोन दिवस पुढे टाकला जातो. यातच दुष्काळात तेरावा महिना वीजपुरवठा खंडित झाल्याचा  परिणाम सरळ पाणीपुरवठ्यावर झाल्यामुळे ज्या भागात बुधवारी सकाळी रोटेशननुसार पाणीपुरवठा करण्यात येणार होता तो आता पुढे़ ढककला गेला आहे. तसेच येणारे पाणीसुद्धा गढूळ येत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. 
 

Web Title: Power supply restored after 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.