शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

गुन्ह्यात मुलांचा वापर रोखण्यासाठी पोलिसांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 22:14 IST

बालक सुरक्षितता सप्ताह : भीक मागण्यासाठी लहान बालकांच्या अपहरणाच्या संख्येत दिवसागिणक होतेय वाढ

जळगाव : गुन्हेगारी टोळ्या आपले ध्येय, उद्दीष्ट व हेतू साध्य करण्यासाठी बालकांचा वापर करीत आहेत, त्यामुळे पालक, शिक्षक यांनीच आपला पाल्य शाळा, महाविद्यालय व क्लासला जातोय का? त्याचे मित्र कोण याची माहिती ठेवून सतत बालकांच्या संपर्कात राहून अशा टोळक्यांपासून त्यांचा बचाव करावा व बालकांनीदेखील अशा व्यक्तींपासून लांब रहावे असे आवाहन अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा विभागाच्या (एएचटीयु) प्रमुख तथा सहायक पोलीस निरीक्षक नीता कायटे यांनी केले.संयुक्त राष्टÑ संघाचे ‘बालकांचे हक्क’ यावर झालेल्या अधिवेशनास २० नोव्हेंबर रोजी ३० वर्ष पूर्ण होत आहे. त्याचे औचित्य साधून पोलीस दलातर्फे बालदिनापासून ‘सर्वत्र बालकांची सुरक्षितता’ या संदर्भात जनजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे. या सप्ताहांतर्गत पोलीस अधीक्षक कार्यालयातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा विभागाच्या (एएचटीयु) प्रमुख नीता कायटे यांनी डॉ.अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महाविद्यालयात विद्यार्थिनींना कायदा व बालकांची सुरक्षितता विषयावर मार्गदर्शन केले.१०९८ टोल फ्री हेल्पलाईनबालकांसाठी शासनाकडून १०९८ ही फ्री हेल्पलाईन सुविधा राखीव ठेवण्यात आली आहे. पोलीस हेल्पलाईन १०३ तर महिला व मुलींसाठी १०९१ ही हेल्पलाईन आहे. या सर्व हेल्पलाईनचा वापर करावा असे आवाहन नीता कायटे यांनी केले आहे. बालविवाह तसेच ‘पोस्को’बाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.बालकांच्या मदतीसाठी ‘जापू’ विभाग कार्यान्वितराज्यात १४ वर्षाखालील हरविलेल्या मुलांच्याबाबतीत थेट अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. चार महिन्यापेक्षा जास्त कालावधीत मुलांचा शोध लागला नाही तर हा गुन्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा विभागाकडे (एएचटीयु) वर्ग होतो. कायद्यानुसार कलम ६३ अन्वये राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात एका पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याशिवाय राज्य बाल सहाय्य पोलीस केंद्र (जापू) विभाग प्रत्येक पोलीस घटकांमध्ये कार्यरत आहेत. दरम्यान, अनेक प्रकरणात भीक मागण्यासाठी देखील बालकांचे अपहरण केले जात असल्याचे उघड झाले आहे, त्यामुळे अनोळखी व्यक्तीपासून सावध रहाण्याची सूचना करण्यात येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव