शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात पंधरा दिवस रात्री १२ पर्यंत वाजवा रे वाजवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 20:43 IST

जळगाव - जिल्ह्यात वर्षभरात एकूण १५ दिवस रात्री बारावाजेपर्यंत स्पीकर वाजविण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबत मंगळवारी जिल्‍हाधिकारी अभिजित ...

जळगाव - जिल्ह्यात वर्षभरात एकूण १५ दिवस रात्री बारावाजेपर्यंत स्पीकर वाजविण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबत मंगळवारी जिल्‍हाधिकारी अभिजित राऊत यांनी आदेश काढले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील नागरिकांनी ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरासाठी मिळालेल्या सवलतीचा लाभ घेताना नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी, असेही आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.ध्वनीप्रदूषण नियंत्रण कायद्यानुसार रात्री दहापर्यंत स्पीकर लावण्यास परवानगी असते. परंतु, सण, उत्सवासाठी वर्षभरात १५ वेगवेगळ्या दिवसांसाठी रात्री बारा वाजेपर्यंत स्पीकर वाजविण्यास सरकारने परवानगी दिली आहे. हे १५ दिवस कोणते, ते ठरविण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२१ याकाळात रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वाजविण्यास सुट असलेले सण, उत्सवांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती (१९ फेब्रुवारी), डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती (१४ एप्रिल), महाराष्ट्र दिवस (१ मे), गणेशोत्सव पाचवा दिवस (१४ सप्टेंबर), गणेशोत्सव सातवा दिवस (१६ सप्टेंबर), अनंत चतुर्दशी (१९ सप्टेंबर), नवरात्रोत्सव अष्टमी (१३ ऑक्टोबर), नवमी (१४ ऑक्टोबर), ईद ए मिलाद (१९ ऑक्टोबर), दिपावली (४ नोव्हेंबर) ख्रिसमस (२५ डिसेंबर), वर्षअखेर (३१ डिसेंबर) आदींचा समावेश आहे. याशिवाय तीन दिवस राखीव ठेवण्यात आलेले आहेत. त्याबाबत जिल्‍हाधिकाऱ्यांच्या मान्‍यतेनुसार महत्‍वाच्‍या कार्यक्रमासाठी आवश्यकतेनुसार परवानगी दिली जाणार आहे.आदेशातील बाबींचे पालन करावेध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरासाठी सूट देताना उच्च न्यायालयाने वेळोवेळी ध्वनी प्रदुषणासंदर्भात दिलेल्या आदेशात नमूद बाबींचे तंतोतंत पालन करावे व न्यायालयाकडील आदेशाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी. ही सवलत राज्य शासनाकडून घोषीत शांतता क्षेत्राला लागू नसल्याने त्याची जबाबदारी पोलीस अधिक्षक व आयुक्त जळगाव शहर महानगरपालिका यांची राहणार आहे.

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJalgaonजळगाव