भुसावळात बनावट दारूचा कारखाना उध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2017 15:32 IST2017-06-17T15:32:12+5:302017-06-17T15:32:12+5:30

पथकाने शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही कारवाई केली. दरम्यान जप्त मद्य बनावट असल्याचा संशय आहे.

In the past, a fake liquor factory collapsed | भुसावळात बनावट दारूचा कारखाना उध्वस्त

भुसावळात बनावट दारूचा कारखाना उध्वस्त

ऑनलाईन लोकमत

भुसावळ , जि. जळगाव, दि. 17 -  भुसावळ तालुका पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर असलेल्या पुरूषोत्तम नगरातून सुमारे दीड लाख रुपये किमतीचा अवैध मद्य साठा जप्त करण्यात आला असून या ठिकाणी बनावट दारू तयार केली जात असल्याचे सांगितले जात आहे.  सहाय्यक पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या पथकाने शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही कारवाई करीत हा कारखानाच उध्वस्त केला. दरम्यान जप्त मद्य बनावट असल्याचा संशय आहे.
तालुका पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर असलेल्या पुरूषोत्तम नगरातून सुरेश चंदाणी यांच्या घरात मोठय़ा प्रमाणावर अवैधरित्या मद्य साठा असल्याची माहिती  पोलिसांना मिळाली होती. त्यावरून या ठिकाणी शनिवारी दुपारी छापा टाकून कार्यवाही करण्यात आली. आरोपी चंदाणी पसार झाला असून जप्त मद्यासह अन्य मुद्देमाल जप्त करण्याची कार्यवाही सुरू होती. या मद्यसाठय़ामध्ये महागडय़ा किंमतीच्या ब्रँडचाही समावेश आहे.

Web Title: In the past, a fake liquor factory collapsed