शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

पाचोरा बाजार समितीच्या भाजी मार्केटचे होणार नामकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:12 IST

पाचोरा : दि. २८ जून रोजी दुपारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य कार्यालय पाचोरा येथे प्रशासकीय मंडळाची ...

पाचोरा : दि. २८ जून रोजी दुपारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य कार्यालय पाचोरा येथे प्रशासकीय मंडळाची सभा पार पडली. या सभेत मार्केट यार्डमधील लिलाव भाजी मंडईला ‘क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले’ यांचे नाव देण्याचा ठराव सोमवारी प्रशासकीय मंडळाच्या सभेमध्ये मंजूर करण्यात आला.

कृषी उत्पन्न बाजार समिती येथे असलेल्या मार्केट यार्डमधील लिलाव भाजी मंडई पाचोरा येथे दैनंदिन भाजीपाला विक्रीचा लिलाव भरतो. तालुक्यातील, जिल्ह्यातील शेतकरी आपल्या शेतातील पिकलेला भाजीपाला आणून या मार्केटमध्ये सर्व व्यापाऱ्यांना लिलाव करतात. दररोज पहाटे चार वाजता येथे भाजीपाल्याचा लिलाव केला जातो. यामध्ये अनेक व्यापारी व शेतकरी दररोज सहभागी होतात.

शहरातील सर्व छोटे-मोठे भाजी विक्रेते या लिलाव मंडई येथे भाजीपाला खरेदीसाठी दररोज येत असतात. बाजार समितीचे प्रशासक अनिल महाजन यांनी मुख्य प्रशासक दिलीप वाघ यांना लेखी पत्र देऊन हा विषय बैठकीच्या अजेंड्यावर घेण्यासंदर्भात विनंती केली होती. त्याअनुषंगाने सभेमध्ये हा विषय घेण्यात आला. अनिल महाजन यांनी या विषयाबाबत मार्केट यार्डमधील लिलाव भाजी मार्केटला ‘महात्मा ज्योतिबा फुले’ यांचे नाव देण्याबाबतचा प्रस्ताव मांडला.

या प्रस्तावाला सर्व प्रशासकीय मंडळाने एकमताने होकार दिला. मुख्य प्रशासक दिलीप वाघ, प्रशासक रणजित पाटील, चंद्रकांत धनवडे, अभय पाटील, युवराज पाटील, शिवाजी पाटील यांनी प्रस्तावाला संमती दर्शवली व एकमताने हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.