शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

ध्येयासाठी अडथळ्यांवर मात करा- सुकन्या पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2017 12:40 IST

नोबेल फाउंडेशनतर्फे जळगावात झाला सत्कार

 ऑनलाईन लोकमत

जळगाव ,दि.3 -  जग प्रचंड मोठे आह़े त्या मानाने माणसाचे आयुष्य खूप छोटे आह़े या छोटय़ाशा आयुष्यात काही मोठे करून दाखवायचे असेल तर वेळेचे नियोजन करायला शिका, आपल्यातील गुण ओळखले पाहिजे, ध्येय ठरविले पाहिजे, ध्येयप्राप्तीच्या प्रवासात अडथळे खूप येतील़ मात्र जिद्द, चिकाटीने सतत प्रयत्न करा, यश हमखास मिळेल, असा सल्ला आयआयटी सुवर्णपदक विजेती सुकन्या पाटील हिने विद्याथ्र्याना दिला़
नोबेल फाउंडेशनतर्फे सुकन्याच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होत़े त्या वेळी ती बोलत होती़ अध्यक्षस्थानी माजी प्राध्यापक होमसिंग पाटील, लेखक डॉ़ किरण देसले, सुकन्याचे वडील विजयसिंग पाटील, आई डॉ़ संगीता पाटील यांची उपस्थिती होती़  
सुकन्या हिचा आई-वडिलांसमवेत स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़ सुकन्या हिचा भाऊ अंकित हाही आयआयटीला असून त्याचाही या वेळी सत्कार करण्यात आला़ विद्यार्थिनी अवंतिका महाजन हिने सुकन्याचा परिचय करून दिला़
आयुष्यात कधी यश, तर कधी अपयश
दहावीत पहिला क्रमांक अपेक्षित असताना, माझा तिसरा क्रमांक आला़ मात्र या अपयशावर कधी रडत बसले नाही़ आई, वडील माङया पाठीशी खंबीरपणे उभे राहिल़े पुण्याला आले अन् अभ्यास केला़ आयुष्य म्हणजे खेळ, कधी यश, तर कधी अपयश मिळणारच़ अपयशानंतरच्या यशाच्या गोडीचा काही वेगळाच आनंद असतो, असेही सुकन्याने सांगितल़े आयआयटी अनेकांचे स्वप्न असते, ते पूर्ण करण्यासाठी शिकण्याचा उत्साह असला पाहिज़े 
या वेळी आयआयटीसाठी निवड झालेल्या प्रथमेश बोरसेसह दहावी परीक्षेतील गुणवंत रोशन रायसिंग, अवंतिका महाजन, पंकज राठोड, हर्षल पाटील, महेश मनोरे यांचाही पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला़ सुकन्या हिचे आई व वडील यांची प्रा़रामचंद्र पाटील व वक्ते मनोज गोविंदवार यांनी मुलाखत घेतली़ 
 सूत्रसंचालन नोबेल फाउंडेशनचे संचालक जयदीप पाटील, तर आभार संचालक विशाल पाटील यांनी मानल़े