शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
2
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
3
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
4
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
5
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
6
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
7
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
8
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
9
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
10
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
11
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
12
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

कट मारल्याच्या वादातून एकाच्या मानेवर केले वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 11:06 AM

दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.

अमळनेर : कट का मारला याचा जाब विचारल्यावरून दोघांनी एकाच्या मानेवर विळा मारून गंभीर जखमी केल्याची घटना १४ रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली.रोहिदास भिल व चंदू भिल रा दरेगाव ता अमळनेर हे दोघे १४ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास दरेगावला मोटरसायकलने जात असताना दरेंगाव फाट्याजवळ राजेश जयवंत महाले उर्फ सोनल घोडेवाला याने त्यांना कट मारल्याने ते खाली पडले व त्यांना जखम झाली म्हणून त्यांनी तांबेपुरा येथील शहाबान पिंजारी याला सांगितल्याने त्याने गोलू खाटीक ला पाठवून दोघांवर उपचार करून त्यांना रवाना केले. त्यांनतर गोलू व शहाबान दोघे सोनल घोडेवाल्याच्या घरी विचार पूस करायला गेले असता तिकडून सोनल व त्याचा मित्र रवींद्र उर्फ गंप्या रामभाऊ जाधव यांनी तुमच्याशी बोलायचे आहे असे सांगून सोनल च्या प्रताप कॉलेज जवळील घोड्याच्या पत्र्याच्या शेड जवळ घेऊन गेला तेथे कट मारल्याचा जाब विचारला असता गंप्या जाधव याने शहाबान च्या मानेवर डाव्या बाजूला हातातील चार कापण्याचा विळा मारून गंभीर जखमी केले.शहाबान च्या मानेतून रक्त भळाभळा वाहू लागले तो जीव घेऊन पळाला. तेथून गोलू सोबत पोलीस स्टेशनला आला. त्यांनतर त्याला उपचारासाठी डॉ अनिल शिंदे यांच्याकडे दाखल केले. गुलाब पिंजारी यांच्या फिर्यादीवरून गँप्या व सोनल घोडेवाला विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास एपीआय राकेशसिंग परदेशी करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmalnerअमळनेर