ऑनलाईन लोकमत
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}खिरोदा,ता.रावेर,दि.20 : येथील तराई वाडय़ात राहणारा अविवाहित तरुण गणेश विष्णू सोनवणे (वय 24) याने राहत्या घरी सोमवारी रात्री लाकडाच्या स:याला दोरी अडकवून गळफास घेतला. ही घटना पहाटे चार वाजता उघडकीस आली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ सावदा पोलीस किरण चाटे, शेख अजीत, देवेंद्र पाटील, घटना स्थळावर येवून पंचनामा केला. मृतदेहाचे शवविच्छेदन रावेर ग्रामीण रुग्णालयातील डॉ.बी.बी.बारेला यांनी केले.
याच भागात महिन्याभरात ही दुसरी घटना आहे. यापूर्वी गिरीष भंगाळे या युवकाने अशा प्रकारे आत्महत्या केली होती. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. या घटनेची सावदा पोलिसात अकस्मात मृत्यू 22/17 ने नोंद करण्यात आली आहे. तरुणाच्या पश्चात आई, वडील, भाऊ, वहिनी असा परिवार आहे. तपास सावदा पोलीस करीत आहेत.