शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

जमावाच्या मारहाणीत एक ठार

By admin | Updated: December 5, 2014 15:10 IST

सालदाराशी वाद घालणार्‍यांना समजविण्यास गेलेल्या एकास सहा जणांनी बेदम मारहाण करून ठार केल्याची घटना कुढावद, ता.शहादा येथे घडली.

 

नंदुरबार :सालदाराशी वाद घालणार्‍यांना समजविण्यास गेलेल्या एकास सहा जणांनी बेदम मारहाण करून ठार केल्याची घटना कुढावद, ता.शहादा येथे घडली. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.
पोलीस सूत्रांनुसार, कुढावद येथील महादू धर्मा चौधरी हे भिका चौधरी यांच्या शेतात कामास असलेल्या सालदाराशी वाद घालत होते. शिवीगाळ करून मारण्याची धमकी देत होते. त्यावेळी भिका चौधरी यांचा मुलगा अर्जुन हा त्या ठिकाणी गेला. त्याने सालदाराशी नेहमीच का वाद घालतात असे विचारले. त्यावरून दोघांमध्ये वादविवाद झाला. वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. 
महादू धर्मा चौधरी याने इतरांना बोलावले, त्यानुसार प्रकाश धर्मा चौधरी, किसन धर्मा चौधरी, बापू धर्मा चौधरी, धर्मा काशिराम चौधरी, शांताबाई धर्मा चौधरी सर्व रा.कुढावद यांनी एकत्र येऊन अर्जुन भिका चौधरी यास हाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. गुप्तइंद्रियाजवळ लाथ मारल्याने तो घाव वर्मी लागला. त्यातच अर्जुन चौधरी याचा मृत्यू झाला.
याबाबत भीमसिंग भिका चौधरी यांच्या फिर्यादीवरून सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक खरे करीत आहे.
दरम्यान, या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. संशयितांना गुरुवारी दुपारी अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात उभे करण्यात येणार आहे.
 
■ सहा जणांनी मिळून अर्जुन चौधरी यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्या गुप्तांगाला जबर मार लागला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. सहाही जणांना सकाळी म्हसावद पोलिसांनी अटक केली आहे. घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.