शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
2
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
3
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
4
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
5
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
6
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
7
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
8
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
9
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
10
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
11
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
12
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
13
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
14
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
15
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
16
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
17
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
18
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
19
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
20
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
Daily Top 2Weekly Top 5

वार्तापत्र क्राईम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:42 IST

सुनील पाटील गुन्हे दाखल झाले, ठेवीदारांना न्याय मिळेल का? भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटी अर्थात बीएचआरमध्ये ठेवीदारांची फसवणूक, ...

सुनील पाटील

गुन्हे दाखल झाले, ठेवीदारांना न्याय मिळेल का?

भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटी अर्थात बीएचआरमध्ये ठेवीदारांची फसवणूक, अपहार झाल्याप्रकरणी पुण्याच्या डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी आर्थिक गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड व पुणे ग्रामीण पोलिसांचे १३५ जणांचे पथक जळगावात पोहचले. या प्रकरणातील बडा मासा जितेंद्र कंडारे व सुनील झंवर या दोघांसह इतरांच्या घरी तसेच कार्यालयांवर छापे घातले. पाच जणांना अटक झाली. ट्रकभरुन पुरावे पोलिसांनी गोळा केले गेले. आणखी तपास सुरु आहे, पुढे काय निष्पन्न होते तो तपासाचा भाग आहे. मात्र, प्रश्न निर्माण होतो, ज्या ठेवीदारांची रक्कम अजूनही अडकली आहे त्यांना ही रक्कम मिळेल का?, त्याशिवाय २५ ते ३० टक्के रक्कम देऊन शंभर टक्के रक्कम मिळाल्याचे शपथपत्र लिहून देणाऱ्या ठेवीदारांनाही त्यांची उर्वरित रक्कम मिळेल का?. ज्यांनी कष्ट करुन पैसा गुंतवला, त्यांना खरे तर व्याजासह रक्कम मिळणे अपेक्षित होती, ती तर सोडाच उलट ३० टक्के रक्कम देऊन शंभर टक्के मिळाल्याचे शपथपत्र घेऊन ठेवीदारांना हाकलून लावले. ज्यांनी हे पाप केले, त्याचे फळ त्यांना मिळेल, काहींना मिळतेय..पण या ठेवीच्या भरवशावर अनेक ठेवीदारांनी मुलांचे लग्न, शिक्षण, नोकरी,घर, जागा विकत घेणे यासह अनेक स्वप्न पाहिली होती, मात्र या चोरांमुळे गरीबांच्या स्वप्नांचा चुराडा व अपेक्षा भंग झाला. आधीच संस्थापक, संचालकांनी ठेवीदारांना धुतले, त्यानंतर ज्यांच्यावर विश्वास ठेवून शासनाने अवसायक म्हणून नेमले त्याने धुण्यावर धुणे धुतले. सेवानिवृत्तीनंतरही कंडारेला तेथेच मुदतवाढ देण्यात आली. अर्थात या साऱ्या कामात राजकीय व काही सरकारी बाबुंचे सहकार्य असणारच, त्यात शंका नाही. त्याशिवाय हे शक्यच नाही. आता देखील राजकीय वादातूनच प्रकरण बाहेर आल्याचे बोलले जात आहे. कारण गुन्हा दाखल झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी १३५ जणांचे पथक जळगावात धडकते. इतकी तत्परता कधीच कोणत्या गुन्ह्यात दिसली नाही. याचाच अर्थ गुन्हा दाखल करण्यापासून तर पथक तयार करणे, त्यांना वाहने उपलब्ध करुन देणे, प‌थकात कोणाला घेणे हे सर्व नियोजितच होते. या प्रकरणात रस असणारे राजकीय नेते असो की तपास यंत्रणा यांनी अशीच तत्परता ठेवीदारांच्या ठेवी काढण्यासाठी दाखवावी, म्हणजे गरीबांसाठी खरोखर कोणाची किती तळमळ आहे हेही लक्षात येईल.