राष्ट्रवादी युवक काँग्रेसने काढली दुचाकीची अंत्ययात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:21 IST2021-07-07T04:21:05+5:302021-07-07T04:21:05+5:30

चाळीसगाव : केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात मंगळवारी येथे इंधन, गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वेगवेगळ्या पेट्रोलपंपांवर निदर्शने करण्यात आली. माजी ...

NCP Youth Congress conducts two-wheeler funeral | राष्ट्रवादी युवक काँग्रेसने काढली दुचाकीची अंत्ययात्रा

राष्ट्रवादी युवक काँग्रेसने काढली दुचाकीची अंत्ययात्रा

चाळीसगाव : केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात मंगळवारी येथे इंधन, गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वेगवेगळ्या पेट्रोलपंपांवर निदर्शने करण्यात आली. माजी आमदार राजीव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही आंदोलने झाली. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी खरजईरोड लगतच्या पेट्रोलपंपावरून मोटारसायकलची अंत्ययात्रा काढली. अंत्ययात्रा अमरधाममध्ये विसर्जित केली गेली. आंदोलनात जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, जिल्हा परिषदेचे गटनेते शशिकांत साळुंखे, किसनराव जोर्वेकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पंचायत समिती सभापती अजय पाटील, ईश्वर ठाकरे, नगरसेवक रामचंद्र जाधव, भगवान पाटील, दीपक पाटील, श्याम देशमुख, सूर्यकांत ठाकूर, हरी जाधव, शिवाजी आमले, शिवाजी सोनवणे, जिभाऊ आधार पाटील, सतीश महाजन, अरुण पाटील, भाऊसाहेब केदार, राकेश नेवे यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मोहित भोसले, शहराध्यक्ष शुभम पवार, गौरव पाटील, सौरभ त्रिभुवन, आकाश पाटील उपस्थित होते.

060721\06jal_5_06072021_12.jpg

राष्ट्रवादीने युवक काँग्रेसने काढली दुचाकीची अंत्ययात्रा

Web Title: NCP Youth Congress conducts two-wheeler funeral