पारोळ्यात इंधन दरवाढीबाबत राष्ट्रवादीकडून निषेध मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:21 IST2021-07-07T04:21:12+5:302021-07-07T04:21:12+5:30

पारोळा : केंद्र सरकारकडून इंधन पेट्रोल व डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या. या वाढत्या किमतीमुळे लोकांचे जीवन आर्थिक संकटात येऊ ...

NCP protests against fuel price hike in Parola | पारोळ्यात इंधन दरवाढीबाबत राष्ट्रवादीकडून निषेध मोर्चा

पारोळ्यात इंधन दरवाढीबाबत राष्ट्रवादीकडून निषेध मोर्चा

पारोळा : केंद्र सरकारकडून इंधन पेट्रोल व डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या. या वाढत्या किमतीमुळे लोकांचे जीवन आर्थिक संकटात येऊ पाहत आहे. या सर्व गोष्टींचा निषेध मोर्चा सकाळी ११ वाजता किसान महाविद्यालयातून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली विविध घोषणा देत थेट तहसील कार्यालयावर धडकला.

सकाळी एका लोटगाडीवर गॅस सिलिंडर, दुचाकी ठेवून व पेट्रोल संपलेली दुचाकी लोटत हा निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी केंद्र सरकारवर टीका केली.

यावेळी माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य रोहन पाटील, हिंमत पाटील, नगरसेवक रोहन मोरे, पंचायत समिती उपसभापती अशोक पाटील, सदस्य ज्ञानेश्वर पाटील, जिल्हा सरचिटणीस मनोराज पाटील, डॉ. शांताराम पाटील, तालुकाध्यक्ष यशवंत पाटील, दिगंबर पाटील, दौलत पाटील, विजय पाटील, भास्कर पाटील, अनिल पवार, संतोष महाजन, किशोर पाटील, राकेश पाटील, युवक तालुकाध्यक्ष योगेश रोकडे, भावी अनिकेत कोळपकर, प्रमोद पाटील, जिजाबराव पाटील, वना महाजन, मन्सराम चौधरी, गणेश पाटील, अंकुश भागवत, जिजाबराव पाटील, नगरसेवक राजेंद्र शिंदे, शहराध्यक्ष कपील पाटील, मुकेश पाटील, अक्षय निकम, महिला अध्यक्षा सुवर्णा पाटील, सुनीता शेंडे, अन्नपूर्णा पाटील, तुकाराम पाटील, प्रमोद पवार, शिवाजी पवार, अनिल पवार उपस्थित होते.

मागण्यांचे निवेदन तहसीलदार अनिल गवांदे यांना देण्यात आले.

Web Title: NCP protests against fuel price hike in Parola