जळगावात भाजीपाला विक्रेत्या महिलेचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:20 IST2021-08-28T04:20:48+5:302021-08-28T04:20:48+5:30

जळगाव : भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या वंदना गोरख पाटील (४५) या महिलेच्या डोक्यात वार करून अज्ञात व्यक्तीने हत्या ...

Murder of a woman vegetable seller in Jalgaon | जळगावात भाजीपाला विक्रेत्या महिलेचा खून

जळगावात भाजीपाला विक्रेत्या महिलेचा खून

जळगाव : भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या वंदना गोरख पाटील (४५) या महिलेच्या डोक्यात वार करून अज्ञात व्यक्तीने हत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी (दि. २७) सकाळी ९ वाजता जळगावातील तुळजामाता नगरात उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगावातील तुळजामाता नगरात भाड्याच्या घरात वंदना पाटील या एकट्याच होत्या. गुरुवारी रात्री वंदना पाटील यांच्या डोक्यावर अज्ञात व्यक्तीने तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केली. इतकेच नव्हे तर खून केल्यानंतर दोरी व साडीच्या साहाय्याने घरातील दरवाजाला गळफास दिला. डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. मुलाचा फोन आल्यानंतर ही घटना उघड झाली.

वंदना पाटील यांच्या घरी अधून-मधून एक व्यक्ती येत होता. ही माहिती नागरिकांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीचा शोध सुरू केला. तो व्यक्ती चोपडा येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर दुपारी एमआयडीसी पोलिसांचे पथक चोपड्यासाठी रवाना झाले होते. घरमालक रमेश सानप यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Murder of a woman vegetable seller in Jalgaon