संगणक परिचालकांचे आजपासून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 17:19 IST2019-08-18T17:17:32+5:302019-08-18T17:19:39+5:30

राज्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर आपले सरकार प्रकल्पात काम करणारे हजारो संगणक परिचालक १९ आॅगस्टपासून कामबंद आंदोलन करणार आहेत.

Movement of computer operators from today | संगणक परिचालकांचे आजपासून आंदोलन

संगणक परिचालकांचे आजपासून आंदोलन

ठळक मुद्देडिजिटल महाराष्ट्र होणार आॅफलाइन -महाराष्ट्र आय.टी. महामंडळात सामावून घ्यावे संगणक परिचालकांचे मानधन चौदाव्या वित्त आयोगातून न देता राज्य शासनाच्या निधीतून द्यावेमागील एप्रिल २०१७ ते जुलै २०१९ पर्यंतचे सर्व थकीत मानधन मिळावे

पाडळसे , यावल, जि.जळगाव : राज्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर आपले सरकार प्रकल्पात काम करणारे हजारो संगणक परिचालक १९ आॅगस्टपासून कामबंद आंदोलन करणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानुसार महाराष्ट्र आय.टी. महामंडळात सामावून घेण्यासह इतर मागण्यांसाठी बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती संघटनेचे राज्याचे अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी दिली.
पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरील संगणक परिचालकांना नियुक्ती देण्यासाठी राज्य मंत्रीमंडळाने मंजुरी दिली असून, त्याचा शासन निर्णय काढून त्यांना महाराष्ट्र आय.टी.महामंडळाकडून नियुक्ती द्यावी. सर्व संगणक परिचालकांचे मानधन चौदाव्या वित्त आयोगातून न देता राज्य शासनाच्या निधीतून प्रती महिना किमान वेतन १५००० रुपये द्यावे. सर्व संगणक परिचालकांचे मागील एप्रिल २०१७ ते जुलै २०१९ पर्यंतचे सर्व थकीत मानधन देणे.
ज्या ग्रामपंचायतीनी आपले सरकार प्रकल्पासाठी निधी दिला नाही तेथील संगणक परिचालकांचे एप्रिल २०१७ ते जुलै २०१९ पर्यंतचे सर्व मानधन शासनाने आश्वासन दिल्याप्रमाणे राज्य शासनाच्या निधीतून करणे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान (शेतकरी कर्जमाफी) योजनेचे मानधन देणे. प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणचे आॅनलाईन सर्व्हे केलेले मानधन मिळणे. नोटीस न देता कामावरून कमी केलेल्या संगणक परिचालकांना परत कामावर घेणे.

Web Title: Movement of computer operators from today