१३ हजारांपेक्षा अधिक लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:17 IST2021-04-04T04:17:14+5:302021-04-04T04:17:14+5:30

बाहेरील १२ रुग्ण जळगाव : जिल्ह्यात इतर जिल्ह्यांतील नव्या १२ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आरटीपीसीआर तपासणीत दहा तर ...

More than 13,000 vaccinations | १३ हजारांपेक्षा अधिक लसीकरण

१३ हजारांपेक्षा अधिक लसीकरण

बाहेरील १२ रुग्ण

जळगाव : जिल्ह्यात इतर जिल्ह्यांतील नव्या १२ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आरटीपीसीआर तपासणीत दहा तर अँटिजन तपासणीत २ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये हे रुग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान, ३ रुग्ण शनिवारी कोरोनातून बरे झाले आहेत.

भुसावळात ॲक्टिव्ह केसेस वाढल्या

जळगाव : भुसावळ तालुक्यातही कोरोनाचा संसर्ग वाढत असून, शनिवारी भुसावळात ३६ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तालुक्यातील ॲक्टिव्ह केसेसची संख्या ११०८ वर पोहोचली आहे, तर मृतांची संख्या २४५ झाली आहे. शनिवारी पुन्हा दोन बाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रुग्णालयाची मागणी

जळगाव : धरणगावात शंभर बेडचे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर व्हावे, अशी मागणी समोर आली असून, याबाबत प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांना हे निवेदन देण्यात आले असून, जिल्हा शल्य चिकित्सकांकडे ते पाठविण्यात आले आहे.

Web Title: More than 13,000 vaccinations