अखिल कोष्टी महासंघाची राष्ट्रीय कोअर कमिटीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:21 IST2021-07-07T04:21:19+5:302021-07-07T04:21:19+5:30

नशिराबाद : अखिल कोष्टी महासंघाची राष्ट्रीय स्तरावरील कोअर कमिटीची तिसरी बैठक नशिराबाद येथे झाली. अखिल कोष्टी युवा फाउंडेशनचे प्रशांत ...

Meeting of National Core Committee of Akhil Koshti Federation | अखिल कोष्टी महासंघाची राष्ट्रीय कोअर कमिटीची बैठक

अखिल कोष्टी महासंघाची राष्ट्रीय कोअर कमिटीची बैठक

नशिराबाद : अखिल कोष्टी महासंघाची राष्ट्रीय स्तरावरील कोअर कमिटीची तिसरी बैठक नशिराबाद येथे झाली. अखिल कोष्टी युवा फाउंडेशनचे प्रशांत खुंटे व अरुण कोष्टी यांनी या बैठकीचे आयोजन केले होते.

अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष किशोर बेलस (नाशिक) होते. उपाध्यक्ष नरेंद्र फिसके (अचलपूर), उपाध्यक्ष रवींद्र नांदुरकर, रवींद्र घोडकर, महासचिव अरुण कोष्टी, महासचिव दिलीप घोडकर, राम सदाफळे, कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर बेलसरे, पुरुषोत्तम खुंटे, दिलीपराव फिसके, सहसचिव गजानन टापरे, श्रीराम मुगल, दीपकराव नांदुरकर, दीपक काळबांडे, रमेश इसाने, रत्नाकर पांढरकर यांच्यासह महासंघाचे राष्ट्रीय पातळीवरील पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

राष्ट्रीय कोअर कमिटी संघाची नोंदणी करणे, वधू-वर परिचय मेळावा आयोजित करणे, कोष्टी समाज जास्त प्रमाणात असलेल्या जिल्ह्यांमध्ये बैठक घेणे, सामाजिक पुरस्कार देणे, सदस्य संख्या वाढविणे इत्यादी विषयांवर चर्चा झाली.

Web Title: Meeting of National Core Committee of Akhil Koshti Federation