शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

मनपाने फक्त स्वतंत्र नवीन कनेक्शन द्यावे, पाण्याच्या टाकीचा घाट नको...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:59 IST

जळगाव : अपार्टमेंटमध्ये वाहने पार्किंगसाठी जागा नसताना, मनपाने नवीन पाण्याच्या टाकीचा घाट घालू नये, आहे त्या टाक्यानांच ...

जळगाव : अपार्टमेंटमध्ये वाहने पार्किंगसाठी जागा नसताना, मनपाने नवीन पाण्याच्या टाकीचा घाट घालू नये, आहे त्या टाक्यानांच स्वतंत्रपणे नवीन नळ कनेक्शन द्यावे, अशी मागणी चंदन अपार्टमेंटमधील नागरिकांमधून करण्यात येत आहे.

मनपा प्रशासनाने अमृतअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आल्यामुळे नागरिकांना नळ कनेक्शन देण्यास सुरुवात केली आहे. अपार्टमेंटमधील रहिवाशांना स्वतंत्र कनेक्शन न देता एका अपार्टमेंटला एकच कनेक्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. या अपार्टमेंटधारकांना आवारात पाण्याची टाकी तयार करायची आहे. मात्र, मनपाच्या या निर्णयाला नागरिकांमधून विरोध होत आहे. प्रतापनगरातील ३५ वर्षांपूर्वी बांधलेल्या चंदन अपार्टमेंटमधील नागरिकांनी मनपाच्या या निर्णयाला विरोध केला आहे. या अपार्टमेंटमध्ये १२ फ्लॅट असून, प्रत्येकाच्या स्वतंत्र पाण्याच्या टाक्या व नळ कनेक्शन आहेत. अपार्टमेंटचा परिसर लहान पडत असल्याने, रहिवाशांना अपार्टमेंटबाहेर वाहने लावावी लागत आहेत. असे असताना मनपाने अपार्टमेंटधारकांना अपार्टमेंटमध्ये स्वतंत्र पाण्याची टाकी उभारण्याचे सांगितल्याने ही टाकी उभारावी कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कोट :

आमच्या अपार्टमेंटमध्ये १२ फ्लॅट असून, प्रत्येकाच्या स्वतंत्र टाक्या व नळ कनेक्शन आहेत. मनपाने अमृत योजनेंतर्गत नवीन टाकीची सक्ती न करता, आहे त्या जुन्या टाक्यानांच स्वतंत्र नळ कनेक्शन द्यावे.

गोकुळ बिर्ला, रहिवासी

मनपाने ही योजना राबविताना नागरिकांची चर्चा करायला हवी होती. त्यांचे अभिप्राय मागावायला हवे होते. मनपाने अशी कुठलीही प्रक्रिया न केल्यामुळे नागरिक या योजनेविषयी संभ्रमात आहेत. यात नागरिकांचे नुकसान होणार आहे.

-प्रा. किशोर राजे, रहिवासी

इन्फो :

अपार्टमेंटमध्ये प्रत्येकाच्या स्वतंत्र अशा १२ टाक्या आहेत. नवीन टाकी उभारायला कुठेही जागा नाही, तसेच इतक्या रहिवाशांना एकच नळ कनेक्शन दिल्यास, पाणी कसे होणार, हा प्रश्न पडत आहे.

-रेखा बिर्ला, रहिवासी