एम.ए. हिंदी विषयात प्रथम, द्वितीय ठरलेल्या लालसिंग, संगीताचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 08:28 PM2021-03-04T20:28:42+5:302021-03-04T20:28:42+5:30

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे विद्यार्थी लालसिंग पावरा व संगीता पावरा हे दोघे एम.ए. ...

M.A. Lalsingh, who came first and second in Hindi, was honored with music | एम.ए. हिंदी विषयात प्रथम, द्वितीय ठरलेल्या लालसिंग, संगीताचा सन्मान

एम.ए. हिंदी विषयात प्रथम, द्वितीय ठरलेल्या लालसिंग, संगीताचा सन्मान

Next

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे विद्यार्थी लालसिंग पावरा व संगीता पावरा हे दोघे एम.ए. हिंदी विषयात प्रथम व द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या बद्दल बँक ऑफ बडोदाच्या जळगाव क्षेत्रीय कार्यालयाच्यावतीने त्यांना मेधावी छात्र सन्मान अंतर्गत रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

लालसिंग पावरा यास ११ हजार रूपये व प्रमाणपत्र आणि संगीता पावरा या विद्यार्थीनीस ७ हजार ५०० रूपये व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी बँकेचे सहायक महाव्यवस्थापक व क्षेत्रीय प्रमुख अरूण मिश्रा, हिंदी विभाग प्रमुख डॉ.सुनील कुलकर्णी, डॉ.प्रिती सोनी, प्रा. मनिषा महाजन, प्रा.तुषार सोनवणे व बँकेचे क्षेत्रीय उप व्यवस्थापक डॉ.व्ही.आर.चौधरी, राजभाषा अधिकारी सुकन्यादेवी उपस्थित होते. भाषा अभ्यास प्रशाळेचे संचालक प्रा.म.सु.पगारे, डॉ.सुनील कुलकर्णी, प्रा.मुक्ता महाजन, प्रा. आशुतोष पाटील यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

 

Web Title: M.A. Lalsingh, who came first and second in Hindi, was honored with music

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.