शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

शौचालय सर्वेक्षणातही हेराफेरी

By admin | Updated: September 9, 2015 16:02 IST

शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानात सर्वेक्षण करून वैयक्तिक शौचालये किती, सार्वजनिक शौचालये किती याबाबत मनपा बांधकाम विभागाचे अभियंते व आरोग्य निरीक्षकांनी सादर केलेल्या अहवालात हेराफेरी

जळगाव : शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानात सर्वेक्षण करून वैयक्तिक शौचालये किती, सार्वजनिक शौचालये किती याबाबत मनपा बांधकाम विभागाचे अभियंते व आरोग्य निरीक्षकांनी सादर केलेल्या अहवालात हेराफेरी आढळून आली असून प्रशासनाने याची दखल घेत फेर सर्वेक्षण करण्याचे आदेश संबंधित अभियंते,आरोग्य निरीक्षकांना देण्यात आले आहेत. दोन दिवसात फेर अहवाल सादर करावा लागणार आहे. 
शासनाने स्वच्छ महाराष्ट्र (नागरी) अभियानांतर्गत राज्यातील महापालिकांच्या अधिकार्‍यांची गेल्या महिन्यात बैठक घेतली होती. तत्कालीन आरोग्याधिकारी डॉ. विकास पाटील, उपायुक्त प्रदीप जगताप हे या बैठकीसाठी मुंबईस गेले होते. या बैठकीत शहरातील वैयक्तिक शौचालयांची संख्या, सार्वजनिक शौचालयांची संख्या, उघड्यावर शौचास बसणार्‍या वस्ती किती याबाबत सर्वेक्षण करून तसा अहवाल तयार करावयाचा होता. मनपा प्रशासनाने या बाबत सर्वेक्षणाच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या होत्या. 
बांधकाम विभागातील चार कनिष्ठ अभियंत्यांना तसेच आरोग्य निरीक्षकांना ही जबाबदारी सोपविण्यात आली होती. या अभियंत्यांनी सादर केलेला सर्वेक्षणाचा अहवाल ढोबळ मनाने असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
शासनाने सर्वेक्षण करताना जी नियमावली दिली तिला फाटा देऊन हे सर्वेक्षण झाले असल्याचे उघडकीस आले आहे.
सादर फॉर्ममध्ये अशा आढळल्या त्रुटी
बांधकाम विभागाने सादर केलेल्या अहवालात त्रुटी आढळल्या आहेत. सादर केलेल्या अहवालात एकूण अर्जांची संख्याच दिली नाही, उघड्यावर शौचास जाणार्‍या कुटुंबांची संख्या दिली नाही, वैयक्तिक शौचालयाकरिता जागा उपलब्ध असलेल्या कुटुंबांची संख्याच दिली नाही, उघड्यावर शौचास जाणार्‍यांपैकी जागा उपलब्ध नसणारी कुटुंबे किती हे दिले नाही, सार्वजनिक शौचालयांकरिता जागा उपलब्ध आहे किंवा नाही, सार्वजनिक शौचालयांचा वापर करणारी कुटुंबे किती या बाबतची माहिती व्यवस्थित सादरच केली नसल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियानात केंद्र व राज्य शासनामार्फत पालिका, महापालिकांकडून सादर होणार्‍या सर्वेक्षण अहवालानंतर वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांच्या संख्येनुसार ते बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यामुळे सर्वेक्षण अहवालाला महत्व आहे. अहवाल योग्य नसल्यास निधी प्राप्त करून घेण्यात अडचण निर्माण होऊ शकते किंवा भविष्यात निधीचाही घोळ होऊ शकतो. त्यामुळे तो पुन्हा करून दोन दिवसात अहवाल मागविण्यात आला आहे.