शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

माॅर्निंगवाॅक करणाऱ्या वकिलाला महामार्गावर चिरडले; इच्छादेवी चौकात अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 13:28 IST

आधारकार्डवरुन पटली ओळख

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल असलेल्या नातेवाईकाला भेटून महामार्गावर माॅर्निंग वाॅकला गेलेल्या अॅड. सतीश शंकर परदेशी (वय ४३,रा. काळे नगर, शिवाजी नगर ) यांना भरधाव वेगाने आलेल्या वाहनाने चिरडल्याची घटना शनिवारी पहाटे सहा वाजता इच्छा देवी चौकात घडली. अपघातानंतर मदत करण्याऐवजी चालक वाहनासह घटनास्थळावरुन फरार झाला आहे. आधारकार्डवरुन परदेशी यांची ओळख पटली.

 सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅड. सतीश परदेशी यांचे काका काही दिवसांपासून आजारी असल्याने त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी ते रात्रभर जिल्हा रूग्णालयातच होते. शनिवारी पहाटे ५.३० वाजता रुग्णालयातून ते माॅर्निंग वाॅक करायला निघाले. सिंधीकॉलनीकडून  महामार्गावरील ईच्छादेवी चौकातून अजिंठा चौकाकडे जात होत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने त्यांना चिरडले. अपघातात त्यांचा डोक्यावरून चाक केल्याने चेहऱ्याचा चेंदामेंदा झाला, त्यामुळे ते जागीच गतप्राण झाले. घटनेची माहिती मिळतात एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.  खिश्यातील आधारकार्डच्या आधारे त्यांची ओळख पटली. पोलिसांनी आजुबाजुला चौकशी केली मात्र कोणत्या वाहनाने त्यांना चिरडले ते समजले नाही. या मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांकडून तपासण्यात आले. 

जळगाव न्यायालयात वकिलीघटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. दरम्यान, परदेशी हे जळगाव न्यायालयात वकिली व्यवसाय करायचे‌. त्यांचे सर्व सहकारी तसेच जिल्हा वकील संघाशी सलोख्याचे संबंध होते. त्यांच्या पश्चात आई गंगाबाई, पत्नी संगिता मुलगा वंश व दोन भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील व मुदस्सर काझी करीत आहे.

टॅग्स :Accidentअपघात