अखेर मनपाने ‘तो’ खड्डा बुजविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:17 IST2021-04-04T04:17:16+5:302021-04-04T04:17:16+5:30

जळगाव : दादावाडीजवळील खड्ड्याच्या दुरुस्तीबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही लोकप्रतिनिधींकडून दखल घेण्यात येत नसल्याने, येथील नागरिकांनी या खड्ड्याला आमदार-खासदारांचे ...

At last Manpa filled the 'he' pit | अखेर मनपाने ‘तो’ खड्डा बुजविला

अखेर मनपाने ‘तो’ खड्डा बुजविला

जळगाव : दादावाडीजवळील खड्ड्याच्या दुरुस्तीबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही लोकप्रतिनिधींकडून दखल घेण्यात येत नसल्याने, येथील नागरिकांनी या खड्ड्याला आमदार-खासदारांचे नाव देऊन सेल्फी पॉईंट सुरू केला होता. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर मनपा प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन, शनिवारी हा खड्डा दुरुस्त केला.

शहरातील महामार्गालगत असलेल्या दादावाडी परिसरातील पाईपलाईनच्या खड्ड्याची दोन महिन्यांपासून, नगरसेवकांना सांगूनही दुरुस्ती करण्यात येत नसल्याने नागरिकांतर्फे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. शुक्रवारी संतप्त रहिवाशांनी या खड्ड्याला थेट आमदार, खासदार व नगरसेवकांचे नाव देऊन सेल्फी पॉईंट बनविला होता. या प्रकारावरून लोकप्रतिनिधींचा अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला होता. तसेच शनिवारी याबाबतचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर मनपा प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली. तत्काळ जेसीबीच्या साहाय्याने त्यात मातीचा भराव टाकून हा खड्डा दुरुस्त केला.

Web Title: At last Manpa filled the 'he' pit