शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

मुलीचे अपहरण फसले

By admin | Updated: June 16, 2014 12:46 IST

जामनेर तालुक्यातील बेटावद गावातून एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीचे शनिवारी दुपारी एका व्हॅनमध्ये अपहरण करीत तिला रात्री ११ वाजेच्या सुमारास जळगावच्या नवीन बसस्थानकाजवळ सोडून दिल्याचे समोर आले आहे.

व्हॅनची तोडफोड : जळगाव बसस्थानकावर सुटका; बेटावदचा मुलगा ताब्यात
जळगाव : जामनेर तालुक्यातील बेटावद गावातून एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीचे शनिवारी दुपारी एका व्हॅनमध्ये अपहरण करीत तिला रात्री ११ वाजेच्या सुमारास जळगावच्या नवीन बसस्थानकाजवळ सोडून दिल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी या प्रकरणात गावातीलच एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
जामनेर तालुक्यातील बेटावद येथील १२ वर्षीय मुलगी शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास गावातील एका किराणा दुकानावर जात होती. या ठिकाणी एका पांढर्‍या रंगाच्या चारचाकी वाहनात एका मुलाने मुलीला गाडीत ओढत बळजबरीने बसविले. त्यानंतर अपहरणकर्ता जामनेर व नेरीमार्गे मुलीला जळगावला घेऊन गेला. 
रस्त्यात या मुलाचा मोबाइल खाली पडल्याने तिने आपल्या वडिलांना फोन करून माहिती दिली. भेदरलेल्या मुलीने प्रथम आपण भुसावळला असल्याचे सांगितले. मुलीचा फोन आल्याने तिच्या कुटुंबीयांची भंबेरी उडाली. 
या मुलीला जळगाव स्थानकावर बसवून आरोपी बाहेर गेला. मुलीने बसस्थानकातील क्वॉईन बॉक्सवरून वडिलांना फोन करीत आपण जळगावला असल्याचे सांगितले. कुटुंबीयांनी तत्काळ जळगावला नोकरीस असलेल्या समाधान नावाच्या नातेवाइकाला फोन लावत बसस्थानकावर पाठविले. आपल्या अपहरणाची माहिती या मुलीने कंट्रोलरला दिली. त्यांनी तत्काळ पोलिसांना कळविले. 
अपहरणाची माहिती मिळाल्यानंतर जिल्हापेठ पोलीस तेथे पोहचले. याच दरम्यान समाधान आणि अपहरण करणारा आरोपी मुलगादेखील या ठिकाणी दाखल झाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
पीडित मुलीच्या काकाने दिलेल्या फिर्यादीनुसार जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला. 
फूस लावून पळवून नेण्याचा प्रयत्न 
अल्पवयीन आरोपीने अल्पवयीन मुलीला गावातून फूस लावून पळवून नेले. मात्र भितीने या मुलीने त्याच्या मोबाइलवरून फोन करीत माहिती दिली.
त्यानंतर काहीवेळाने तिच्या वडिलांनी त्याच मोबाइलवर फोन केल्याने आरोपीने मुलीला बोलायला सांगत आम्ही भुसावळला असल्याचे बोलायला लावले. 
आरोपी हा व्हॅनचालक असून यापूर्वीही त्याने दोन-तीन मुलींसोबत प्रेमसंबंध जुळविल्याची चर्चा आहे. गाडीची तोडफोड पोलिसांनी महिला दक्षता समिती सदस्या अँड.शीला गोडबे यांच्यासमोर मुलीचा जबाब घेतला. उपनिरीक्षक व्ही.आर.शित्रे यांनी संशयित मुलाला ताब्यात घेतले. अल्पवयीन मुलीचे मुलाने अपहरण केल्याचे समजताच जामनेर पोलीस स्टेशनमध्ये गर्दी झाली. या वेळी बेटावद येथून आरोपीचे नातलगही जामनेरला आले होते. नातेवाइकांना आरोपीची व्हॅन रस्त्यावर लावलेली दिसली. काहींना ही माहिती मिळताच त्यांनी गाडीच्या काचा फोडल्या. पोलिसांनी वेळीच दखल घेतल्याने गाडीची अधिक तोडफोड झाली नाही. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक रफिफ शेख नंदुरबार येथून जामनेला दाखल झाले. शेख यांची नंदुरबार येथे सुरू असलेल्या पोलीस भरतीच्या ठिकाणी नियुक्ती होती.
---------
 
तपासाधिकारी विश्‍वास शित्रे यांनी या घटनेबाबत 'लोकमत'ला माहिती दिली. एकाच गावात राहणारे अल्पवयीन मुलगा व मुलगी हे शनिवारी दुपारी बेटावद येथून एका रिक्षाने वाडी किल्ला येथे आले. काही वेळ थांबल्यानंतर दोघे जामनेरला आले. या ठिकाणी या मुलाने आपल्या मित्रासाठी काही भांडे खरेदी केले. त्यानंतर बसने प्रवास करीत ते गाडेगावजवळ उतरले. मुलगा भांडे देण्यासाठी मित्राकडे गेला. या दरम्यान बालिकेच्या हातात या मुलाचा मोबाइल लागला. अर्धा तास या ठिकाणी थांबल्यानंतर दोघे एका बसने जळगावात आले. मुलाच्या सांगण्यानुसार मुलीने आपण भुसावलला असल्याचे फोनवरून कुटुंबीयांना सांगितले. त्यानुसार कुटुंबीय भुसावळला रवाना झाले. या दरम्यान बसस्थानकावर एका कोपर्‍यात या मुलीला बसवून मुलगा बाहेर गेला. एक ते दीड तास मुलगा न आल्याने मुलीने आपल्या वडिलांना फोन करून आपण जळगावला असल्याचे कळविले. मुलीच्या कुटुंबीयांनी नात्यातील एका तरुणाला बसस्थानकावर पाठविले. मुलीला नेमके काय झाले याबाबत चौकशी केल्यानंतर तिने आपले अपहरण झाल्याचे सांगितले. तोपर्यंत कुटुंबीयदेखील जळगावात दाखल झाले. हा अपहरणाचा प्रकार आहे की दोघे संमतीने बाहेर गेले याबाबतचा तपास सुरू असल्याचे शित्रे यांनी सांगितले.