जळगावात चोरट्यांनी चक्क तिजोरीच लांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:20 IST2021-07-07T04:20:45+5:302021-07-07T04:20:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील विसनजीनगरातील जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्था मर्यादित (जिल्हा मार्केटिंग फेडरेशन) ...

In Jalgaon, the thieves stole the safe | जळगावात चोरट्यांनी चक्क तिजोरीच लांबविली

जळगावात चोरट्यांनी चक्क तिजोरीच लांबविली

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील विसनजीनगरातील जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्था मर्यादित (जिल्हा मार्केटिंग फेडरेशन) या संस्थेत झोपलेल्या वाहनचालकाच्या गळ्यावर लोखंडी टॉमी ठेवून जागेवरच ठार मारण्याची धमकी देत चोरट्यांनी अडीच लाखांची रोकड ठेवलेली तिजोरी, सीसीटीव्ही कॅमेरे व डीव्हीआर असा मुद्देमाल चौघांनी लांबविल्याची घटना मंगळवारी पहाटे पावणेचार वाजता घडली. दरम्यान, चारचाकी वाहनाने आलेले चारही चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

शहरातील केंद्रावर दूध वाटप करून आल्यानंतर चालक घनश्याम पंडित सोनार (वय ३८, रा.तुळजाईनगर) व त्यांचा भाचा पीयूष सोनार असे दोघे जण पहाटे ३.१५ वाजता संस्थेत वेगवेगळ्या खोलीत झोपले. सोनार गाढ झोपेत असताना ३.४५ वाजता चार जण आतमध्ये आले व त्यातील एकाने गळ्यावर लोखंडी टॉमी ठेवली हिंदीत संवाद साधून जागेवरच पडून राहा, नाही तर तुझा इथेच गेम करतो म्हणून दम दिला. त्यामुळे सोनार हे जागेवर तसेच पडून राहिले. एक जण तेथेच थांबून राहिला, तर इतर तीन जण पुढे गेले. त्यांनी तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना अपयश आले. त्यामुळे चोरट्यांनी दोन टन वजनाची तिजोरी ढकलत बाहेर आणली व चारचाकीत ठेवून निघून गेले.

Web Title: In Jalgaon, the thieves stole the safe