शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘वोट’ देणे अधिकार आणि कर्तव्य पण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 16:10 IST

रांगोळीतून मतदान जनजागृती : पालकांनी घेतली मतदानाची प्रतिज्ञा

जळगाव- नागरिकांनी विधानसभा निवडणुकीमध्ये लोकशाहीला बळकट करण्यासाठी मतदानाचा हक्क बजवावा, याकरिता मानव सेवा विद्यालयातील विद्यालयात रांगोळीच्या माध्यमातून ‘वोट’ देणे अधिकार पण आहे व ‘वोट’ देणे कर्तव्य पण आहे, असे संदेश देवून मतदानाविषयी जनजागृती करण्यात आली.प्रशासनासह शाळा, महाविद्यालय व सामाजिक संघटनांकडून शहरामध्ये पथनाट्य, स्पर्धा तसेच विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीसाठी मतदार जनजागृती करण्यात येत आहे. त्यातंर्गत शाळांमधील पालकांमध्ये व नागरिकांमध्ये मतदान जनजागृती व्हावी, म्हणून सोमवारी मानवसेवा विद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ ‘वोट’ देणे अधिकार पण आहे व ‘वोट’ देणे कर्तव्य पण आहे, असा संदेश देणारी भव्य रांगोळी काढण्यात आली. नंतर परिसरातील मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली. त्यानंतर मतदानाची प्रतिज्ञा घेण्यात आल्यानंतर चित्रकला व रांगोळी स्पर्धा विद्यालयात पार पडली. यामध्ये असंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका माया अंबटकर, मुक्ता पाटील यांच्यासह सुनील दाभाडे यांनी परिश्रम घेतले़ तसेच विद्यार्थ्यांनी निवडणुकीपर्यंत घरासमोर मतदान जनजागृती करणाऱ्या रांगोळ्या काढव्यात अशा सूचना करण्यात आल्या आहेत.४०० च्यावर पालकांनी घेतली मतदानाची प्रतिज्ञाविधानसभा निवडणुकीसाठी लवकरच मतदान होणार आहे, आणि मतदारांनी निर्भीडपणे कुठल्याही आमिषाला बळी न पडता मतदानाचा हक्क बजवावा, यासाठी प.वि.पाटील विद्यालयात पालकसभा पार पडली. यामध्ये तब्बल ४०० च्यावर पालकांनी मतदान करण्याबाबत प्रतिज्ञा घेतली. नंतर मुख्याध्यापिका रेखा पाटील यांनी मतदान जनजागृती केली. तसेच शालेय परिसरातून विद्यार्थ्यांकडून जनजागृती रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी विविध घोषवाक्य लिहीलेले पोस्टर हातात पकडून जनजागृती केली. 

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव