शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अवैध गौण खनिज वाहतूक सुसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 22:42 IST

विश्लेषण

जळगाव : शहर व परिसरात गौण खणिजाची वाहतूक सुरूच असून तीन दिवसात तीन कारवाया होऊनही त्यास चाप बसत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे महसूल विभागाला हे वाहतूक जुमानत नाही का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.मुरूमचा अवैधरीत्या उपसा करून त्याची वाहतूक करीत असलेले दोन डंपर जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनाच आढळून आले. त्यानंतर त्यांनी तहसीलदारांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार क्षमतेपेक्षा अधिक मुरूमचा उपसा केल्याने संबंधित डंपर मालकांला एक कोटी तीन लाख चार हजारांचा दंड करण्यात आला. हा प्रकार होत नाही तोच दुसऱ्या दिवशी निमखेडी येथे अवैध वाळू आढळून आली व तिसºया दिवशी डबरची वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त करण्यात आले.मेहरूण परिसरात जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे यांना दोन डंपर मुरूमची वाहतूक करताना आढळून आले होते. त्या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी या डंपरला थांबवून चौकशी केली असता डंपर चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्या वेळी जिल्हाधिकाºयांनी तहसीलदार ांना डंपरची चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार तहसीलदारांनी पंचनामा केला. अवैधरीत्या मुरूम वाहतूक करताना व एक पोकलँड अवैधरीत्या उत्खनन करताना उघड झाले. दोन्ही डंपर जप्त करून ते जिल्हाधिकारी कार्यालयात लावण्यात आले आहेत. या प्रकरणात डंपर मधील मुरुम व उत्खनन केलेल्या जागेची चौकशी केली असता त्यात ठरवून दिलेल्या क्षमतेपेक्षा अधिक मुरूम काढल्याचे आढळून आले.अवैधरीत्या वाहतूक करणारी वाहनांनी शिरसोली येथील तलावातून महामार्ग क्रमाक ५३ (जुना महामार्ग) च्या चौपदरीकरणासाठी मुरूम उत्खनन केले होते. उमाळा गट क्रमांक २०४ मध्ये १५०० ते १६०० ब्रास नवीन खोदकाम आढळून आले. उत्खननास परवानगी होती. मात्र उत्खनन सरकारी गट क्रमांक २०४मध्ये झालेले आढळून आले. अंदाजे ६०० ब्रास अवैधरीत्या गौणखनिज उत्खनन झालेले पथकास आढळून आले. त्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणी अशा प्रकारे अवैध उपसा होत असेल तरी ग्रामीण भागात काय स्थिती असेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव