शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

बनावट अपंगत्व असल्यास थेट फौजदारी

By admin | Updated: June 18, 2017 13:19 IST

जळगाव जि.प. सीईओंचे आदेशामुळे कर्मचा:यांमध्ये खळबळ

बनावट अपंगत्व असल्यास थेट फौजदारी
जळगाव जि.प. सीईओंचे आदेशामुळे कर्मचा:यांमध्ये खळबळ
ऑनलाईन लोकमत
अमळनेर,दि.18 : जळगाव जिल्हा परिषदेतील सर्व अपंग कर्मचा:यांची  मुंबई येथून पुन्हा फेरतपासणी करावी.  प्रमाणपत्र मध्ये तफावत आढळल्यास गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी सर्व विभागाना दिले आहेत.
बदली प्रक्रियेपासून बचाव करण्यासाठी जिल्ह्यातील अनेक शिक्षक , ग्रामसेवक आणि विविध विभागातील कर्मचा:यांनी बनावट अपंगांचे दाखले जोडून सवलती मिळविल्या आहेत.  त्यामुळे ख:या अपंगांवर आणि इतर कर्मचा:यांवर अन्याय झाला आहे. याबाबत अनेकदा तक्रारी झाल्यात. मात्र वैद्यकीय दाखले ग्राह्य धरून दुर्लक्ष करण्यात आले. वैद्यकीय दाखल्यांबाबतही तक्रारी झाल्यात त्यानंतर सर्व अपंग कर्मचा:यांची धुळे येथील वैद्यकीय बोर्डाकडून पडताळणीचे आदेश दिले होते. मात्र त्यातही गैरप्रकार झाल्याची तक्रार अपंग कर्मचारी संघटनेकडून झाली होती. शासनाकडून देण्यात येणा:या अपंग भाडे सवलती, अपंग भत्ता, आदींचा फायदा घेत शासनाला लुबाडले जात होते. अत्याधुनिक औषधी यंत्रणा उपलब्ध असताना अपंगांची संख्या वाढली आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी संघटनेच्या तक्रारीची दाखल घेत 12 जून रोजी फेर तपासणीचे आदेश निर्गमित केले आहेत.   
ख:या अपंगांना न्याय मिळेल : पाटील
जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी घेतलेला निर्णय धाडसी आहे. अनेकांनी बोगस प्रमाणपत्रांच्या आधारावर पदोन्नती घेतली आहे. मात्र या पडताळणीतून ख:या अपंगाना न्याय मिळणार आहे. प्रशासनाने मात्र पाठपुरावा कायम ठेवण्याची अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघाचे राज्य कोषाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी व्यक्त केली.