शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

परिस्थितीनं लिहितं केलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 01:06 IST

माझी लेखन प्रेरणा

स्वप्नरंजनात कल्पनांच्या भराऱ्या अधिक असतात. मात्र स्वानुभावाच्या भट्टीत जे तावून-सुलाखून येतं; त्या लेखनाचा बाज वेगळा आणि जोरकस असतो. घरात लेखनाची परंपरा नसली तरी, परिस्थितीनं संघर्ष करण्याबरोबरच मन:पटलावर गोंधलेलं कागदावर उतरवण्याचं वळण लावलं. मी लिहित गेलो. समृद्ध होणं मात्र अजूनही सुरुच आहे.चौथीची परीक्षा पास झालो. त्याच वर्षी वडिलांनी चाळीसगाव येथील कापड गिरणीतील कामगाराच्या नोकरीला सोडचिठ्ठी दिली. वर्ष होतं १९८४. बसस्थानकात ओरडून वर्तमानपत्र विकण्याचं काम सुरू केलं. पुढे घरोघरी वर्तमानपत्रं टाकण्याचं काम मिळालं. यातूनच पहाटे रेल्वे स्थानकावर जाऊन वर्तमानपत्रांचे गठ्ठे उतरवणं, पुरवण्या टाकणं अशी कामंही सुरू झाली. वर्तमानपत्रांचं आकर्षण निर्माण झालं. वाचनाचा छंदही जडला.कधी-कधी वर्तमानपत्रांच्या दोन-चार पुरवण्या जादा येत. त्या घरी आणून त्यांचं वाचन करू लागलो. शाळा आणि वर्तमानपत्र वाटण्याचं काम. माझ्या आयुष्याची सायकल अशा दोन चाकांवर सुखेनैव फिरत होती. याच दरम्यान चाळीसगावातील शेठ ना.बं. वाचनालयाशी परिचय झाला. महाविद्यालयात गेल्यावर ग्रंथालयाचं मोठं दालन पाहून हरखून गेलो. पुस्तके खुणावू लागली. पूर्ण रविवार 'वाचू आनंदे' असा सत्कारणी लागायचा. कालौघात शिक्षकी पेशात रुजलो. दरदिवशी दोन तास वाचनाचं वेळापत्रकच तयार केलं. हा शिरस्ता आजही कायम आहे. राज्यभरातील आघाडीची वर्तमानपत्रं, मासिकं, साप्ताहिकं आणि नियतकालिकांमधून कविता व लेखातून व्यक्त होऊ लागलो. नामवंत दिवाळी अंकांमधून साहित्याची हजेरी लागली. पत्रकारिता क्षेत्राबद्दल आकर्षण होतं. मेहनतीनं आणि सरावानं यातही प्रवेश केला. पत्रकारितेत उमविमध्ये एम.ए. पूर्ण केले. चार काव्यसंग्रहांचं प्रकाशन झालं. मान्यवरांसाठी दिडशेहून अधिक मानपत्रंही लिहिली आहेत. स्मरणिका, गौरवग्रंथांचं संपादन करण्याची संधी मिळाली. पत्रकारितेमुळे लेखनाला आटोपशीर करण्याचा संस्कार मिळाला. लेखन वारी सुरुच असली तरी त्याचं रिंगणही पूर्ण व्हावं, हे ध्येय घेऊनच आयुष्य पादाक्रांत करतोय. आयुष्यात हे ध्येय पूर्ण होईल, अशी आशा आहे.- जिजाबराव वाघ