शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्ष असल्याची लाज वाटली

By admin | Updated: July 17, 2014 15:01 IST

चोपडा आगारातील बसची दयनीय अवस्था पाहून आपल्याला एस.टी.महामंडळाचे अध्यक्ष असल्याची लाज वाटल्याचे हताश उद्गार जीवन गोरे यांनी काढले.

 

 
जळगाव : एस.टी. चा प्रवास हा सुरक्षित प्रवास, हा सर्वसामान्य नागरिकांचा असलेला विश्‍वास हेच आपले भांडवल आहे. प्रवाशांचा हा विश्‍वास तुम्ही तोडू नका. चोपडा आगारातील बसची दयनीय अवस्था पाहून आपल्याला एस.टी.महामंडळाचे अध्यक्ष असल्याची लाज वाटल्याचे हताश उद्गार जीवन गोरे यांनी काढले. यावेळी त्यांनी अधिकार्‍यांची चांगलीच झाडाझडती घेतली.
एस.टी.महामंडळाच्या कार्यशाळेत दुपारी चार वाजेच्या सुमारास स्वागत समारंभ झाला. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अँड.रवींद्र पाटील, एस.टी.चे प्रादेशिक परिवहन अधिकारी गुलाबराव पाटील, विभागनियंत्रक राजीव साळवे, यंत्र अभियंता प्रमोद पाटील यांची उपस्थिती होती. सुरुवातीला एस.टी.च्या विविध संघटनांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर पदाधिकारी व महिला कर्मचार्‍यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन अध्यक्षांना सादर केले.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात गोरे यांनी एस.टी.कर्मचार्‍यांना देण्यात आलेल्या वेतन करारामुळे दोन हजार कोटी रुपयांचा भार पडला असल्याचे सांगितले. जो पर्यंत कामगार आणि प्रशासन समाधानी राहत नाही तो पर्यंत ते प्रवाशांच्या अपेक्षा पूर्ण करणार नाही अशी आपली त्या मागची भूमिका होती. महामंडळाने वेतन करार करून आपले कर्तव्य पूर्ण केले आहे. मात्र आता अधिकारी व कर्मचार्‍यांनीदेखील प्रामाणिकपणे काम करून त्याची परतफेड करण्याची गरज आहे. प्रवाशांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवून प्रवाशांना आकर्षित करण्यावर भर द्या असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. 
कर्मचार्‍यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आपण राज्यभर दौरा काढला आहे. सकाळी चोपडा आगाराची पाहणी केल्यानंतर त्या ठिकाणी उद्घोषणा कक्षच नसल्याचे लक्षात आले. आगारात उभ्या असलेल्या बहुतांश एस.टी.बसेची अवस्था ही खराब झाली होती. हे सारे चित्र पाहिल्यानंतर त्यावेळी 'आपण एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष असल्याची लाज वाटली.'
------------
काही महिला कर्मचार्‍यांनी पिण्याच्या पाण्याबाबत आणि शौचालयाबाबतची समस्या मांडली. गोरे यांनी विभाग नियंत्रक साळवे यांना त्याचा जाब विचारला. प्रवाशांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी आधुनिक यंत्र, स्वच्छतागृह आणि चालक व वाहकांसाठी विश्रांतीगृह हे उपक्रम राज्यभरात चांगले राबविण्यात येत आहेत. तर मग जळगावात हे उपक्रम राबविण्यात काय अडचण आहे, असा सवाल त्यांनी केला. यावेळी त्यांनी प्रत्येक बसस्थानकावर संपूर्ण स्टीलच्या खुच्र्या बसविण्याचा प्रस्ताव पाठविण्याचे आदेश दिले.