परतीच्या पावसाचा तडाखा, रस्ते जलमय, नद्यांना पूर; १० ते १२ दिवसांपासून कधी मुसळधार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 09:34 IST2025-09-28T09:32:41+5:302025-09-28T09:34:00+5:30
यामुळे कजगाव नागद मार्ग बंद नगरदेवळा ते नगरदेवळा स्टेशन ता.. पाचोरा येथे मोठ्या पुलावरुन पाणी वाहत आहे.

परतीच्या पावसाचा तडाखा, रस्ते जलमय, नद्यांना पूर; १० ते १२ दिवसांपासून कधी मुसळधार
चाळीसगाव( जळगाव): यंदा पर्जन्यमानाचे वेळापत्रक कोलमडलेल्या चाळीसगाव, पाचोरा आणि भडगाव तालुक्याला परतीच्या पावसाने चांगलाच तडाखा दिला आहे. गत १० ते १२ दिवसांपासून कधी मुसळधार तर कधी भिज पावसाने पिकांना नख लावले आहे. शनिवारी रात्री शहर परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने रविवारी सकाळी रस्ते जलमय झाले तर व्यापारी संकुलांमध्येही पाच साचले. चाळीसगाव तालुक्यातील डोंगरी व तितूरसह अनेक नदयांना पुन्हा पूर आला आहे.
आडगांव ता. चाळीसगाव येथे जवळ जवळ १२ तासांच्या वर संततधार जोरदार पाऊस झाला. पाटणादेवी परिसरात रात्रभर जोरदार पाऊस झाला. कजगाव ता भडगावनजीक तितुर नदीला मोठा पुर आला आहे.यामुळे कजगाव नागद मार्ग बंद नगरदेवळा ते नगरदेवळा स्टेशन ता.. पाचोरा येथे मोठ्या पुलावरुन पाणी वाहत आहे.