सुप्रीम कॉलनीत हार्डवेअरच्या गोदामाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:56 IST2021-02-05T05:56:53+5:302021-02-05T05:56:53+5:30

शाहिद शेख मुश्ताक यांचे नशिराबाद येथे स्टॉर हार्डवेअर नावाने होलसेल दुकान आहे. माल ठेवण्यासाठी त्यांनी सुप्रीम कॉलनीत पत्र्याचे गोदाम ...

Hardware warehouse fire in Supreme Colony | सुप्रीम कॉलनीत हार्डवेअरच्या गोदामाला आग

सुप्रीम कॉलनीत हार्डवेअरच्या गोदामाला आग

शाहिद शेख मुश्ताक यांचे नशिराबाद येथे स्टॉर हार्डवेअर नावाने होलसेल दुकान आहे. माल ठेवण्यासाठी त्यांनी सुप्रीम कॉलनीत पत्र्याचे गोदाम घेतले आहे. शनिवारी सकाळी १० वाजता या गोदामाला अचानक आग लागली. परिसरातील नागरिकांनी मिळेल तेथून पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला व आगीची माहिती मालक शाहिद शेख व त्यांचे भाऊ मुजफ्फर शेख यांना कळविली. अग्निशमनच्या दोन बंबाद्वारे आग विझविण्यात आली. प्रचंड धुराचे लोट बाहेर पडत असल्याने गोडावूनचे पत्रे काढून पाण्याचा मारा करण्यात आला. तब्बल तासाभरानंतर आग आटोक्यात आली. गोदामातील शौचालयाचे भांडे, ६० जुने फ्रीज, फ्लश टँक, पाण्याच्या टाक्या, पाईप बंडल, भांड्याचे सीट कवर, अ‍ॅक्वा पाईप बंडल आदी साहित्यांचे जळून नुकसान झाले. भीषण आगीत चिनी भांडे फुटल्याने तसेच जळून नुकसान झाले आहे. शौचालयांच्या भांड्यासह इतर चिनी वस्तूंमध्ये असलेल्या गवतामुळे आग जास्त भडकली. एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Web Title: Hardware warehouse fire in Supreme Colony