महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 12:02 IST2019-12-06T12:02:04+5:302019-12-06T12:02:23+5:30

जाहीर सभा

Greetings to Dr. Babasaheb Ambedkar for Mahaparinirvana Day | महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

जळगाव : संविधान जागर समितीतर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने रेल्वे स्टेशन जवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ जाहीर अभिवादन सभा झाली. या वेळी मान्यवरांनी बाबासाहेबांच्या पुतळ््यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
अभिवादन सभेच्या अध्यक्षस्थानी लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे होत्या. या वेळी आमदार सुरेश भोळे, महापौर सीमा भोळे, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, प्रांताधिकारी दीपमाला चौरे, मनपा आयुक्त डॉ. उदय टेकाळे, संविधान जागर समितीचे संयोजक मुकूंद सपकाळे, डॉ. प्रकाश कांबळे, करीम सालार, अशफाक पिंजारी, फईम पटेल, रिक्षा युनियनचे जिल्हाध्यक्ष, दिलीप सपकाळे, संभाजी ब्रिगेडचे खुशाल चव्हाण, चंदन बिºहाडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन हरिश्चंद्र सोनवणे यांनी केले.

रिपाइंतर्फे अभिवादन
रिपाइंतर्फे (आठवले गट) रेल्वे स्टेशन जवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ अभिवादन करण्यात आले. या वेळी महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, तालुकाध्यक्ष रमाबाई ढिवरे, कार्याध्यक्ष सागर सपकाळे, युवक अध्यक्ष मिलिंद सोनवणे, प्रताप बनसोडे आदी उपस्थित होते.

Web Title: Greetings to Dr. Babasaheb Ambedkar for Mahaparinirvana Day

टॅग्स :Jalgaonजळगाव