गरिबांच्या पायांच्या चटक्यांना गोल्डन हार्ट ग्रुपचा गारवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:19 IST2021-05-25T04:19:21+5:302021-05-25T04:19:21+5:30

अमळनेर : मेच्या उन्हाचा तडाखा आणि कोरोनामुळे रोजगार हिरावलेला. अशात गरीब लहान मुले, काही वृद्ध, निराधार आणि ...

Golden Heart Group's garland on the feet of the poor | गरिबांच्या पायांच्या चटक्यांना गोल्डन हार्ट ग्रुपचा गारवा

गरिबांच्या पायांच्या चटक्यांना गोल्डन हार्ट ग्रुपचा गारवा

अमळनेर : मेच्या उन्हाचा तडाखा आणि कोरोनामुळे रोजगार हिरावलेला. अशात गरीब लहान मुले, काही वृद्ध, निराधार आणि भिकारी अनवाणी चटके सहन करून फिरत असताना त्यांच्या होणाऱ्या वेदनांना फुंकर घालण्यासाठी गोल्डन हार्ट ग्रुप पुढे सरसावला अन् पायांना चपलांच्या माध्यमातून गारवा दिला.

गोल्डन हार्ट ग्रुपच्या तरुणांनी अनवाणी भटकणाऱ्या ५० ते ६० लोकांना चप्पल वाटप केले. या उपक्रमात श्रीनाथ पाटील, सनी गायकवाड, कृष्णा बोरसे, मुशाहीद शेख, राहुल बिऱ्हाडे, आकाश सैंदाने, वरुण पाटील, भावेश पाटील, सिद्धू पाटील, दुर्गेश साळुंखे, अनिकेत परदेशी, हर्षल पाटील, यश पवार, देव गोसावी, अथर्व डेरे यांचे सहकार्य आहे तर विनोद पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील, बंडू जैन, पोलीस कॉन्स्टेबल बाळू शिंदे, चैतन्य संदांशिव, मंगेश कुलकर्णी, चेतन पाटील, हरिओम अग्रवाल, कल्पेश पाटील, निखिल पाटील, भूषण साळुंखे, लखन पंजवानी, जालू चौधरी, आकाश साळुंखे, विशाल महाजन, सागर चौधरी यांचे आर्थिक योगदान लाभत आहे.

Web Title: Golden Heart Group's garland on the feet of the poor