शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
5
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
6
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
7
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
8
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
9
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
10
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
11
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
12
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
13
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
14
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
15
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
16
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
17
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
18
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
19
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
20
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना कर्जमाफीपेक्षा त्यांच्या शेतमालाला हमी भाव द्या : खासदार सुप्रिया सुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 21:57 IST

कर्जमाफी देण्यापेक्षा त्यांच्या शेतीमालाला हमीभाव देवून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची गरज असल्याचे मत युवा संवाद यात्रेप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे यांनी युवक-युवतींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना व्यक्त केले.

ठळक मुद्देधरणगाव येथील एका युवकाच्या प्रश्नाने खासदार सुप्रिया सुळे निरूत्तरस्त्रीभ्रूण हत्या, हुंडाबळी, महिला अत्याचारावर केले मार्गदर्शनविद्यार्थ्यांनी विचारले शिक्षण, बेरोजगारीवरील प्रश्न

धरणगाव : कृषीप्रधान असलेल्या देशात शेतकरी राजा आर्थिक संकटात सापडल्याने आत्महत्या करीत आहे. शेतकºयांना कर्जमाफी देण्यापेक्षा त्यांच्या शेतीमालाला हमीभाव देवून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची गरज असल्याचे मत युवा संवाद यात्रेप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे यांनी युवक-युवतींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना व्यक्त केले.कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात स्त्रीभ्रूण हत्या, हुंडाबळी, युवतीवरील अत्याचार व युवकांची व्यसनाधिनता विरोधात त्यांनी प्रबोधनात्मक विचार व्यक्त केले.प्रास्तविक संस्थेचे सचिव डॉ.मिलींद डहाळे यांनी केले. माजी मंत्री गुलाबराव देवकर , राष्टवादीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील, युवती जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील, पी.आर.संस्थेचे अध्यक्ष डॉ.अरुण कुळकर्णी, संचालीका निनाताई पाटील, प्राचार्य डॉ.टी.एस. बिराजदार, मुख्याध्यापक प्रा.बी.एन. चौधरी, के.एम. पाटील, सी.के.पाटील उपस्थित होते.तुझ्या प्रश्नाचे उत्तर मोदीसाहेबच देतील...ईश्वर पवार या विद्यार्थ्याने आपली परिस्थिती गरीबीची असल्याने मी विज्ञान शाखेत प्रवेश घेवू शकलो नाही. आरक्षण घटकात मोडत नसल्याने वाणिज्य शाखेला प्रवेश घ्यावा लागला. शेतकºयाच्या लेकरांना सरकार फी माफी देत नाही तर दुसरीकडे मल्टीनॅशनल कंपन्यांना भरमसाठ सवलती सरकार देत आहे. तेव्हा हे सरकार १२५ कोटी जनतेचे आहे की मल्टीनॅशनल कंपन्यांचे..? असा प्रश्न उपस्थित करताच टाळ्यांचा गजर झाला. यावेळी खासदार सुळे मात्र निरुत्तरीत झाल्या. या प्रश्नाचे उत्तर मोदी साहेबच देवू शकतील. मी तुझा प्रश्न त्यांना टिष्ट्वटर वरुन विचारते व तुला कळवते असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेDharangaonधरणगाव