शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI च्या विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
4
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
5
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
6
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
9
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
10
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
12
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
13
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
14
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
15
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
16
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
17
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
18
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
19
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
20
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

विचारांची सांगड चळवळीतून रुजवा

By admin | Updated: January 12, 2015 13:33 IST

माध्यमांतून विचारांची सांगड रुजविण्यासाठी चळवळींनी पुढे यावे. विचारधारा आणि मूल्ये यांच्यात तडजोड करून चालणार नाही. यात विकास हवा, शोषण नाही, असा सूर परिसंवादातून उमटला.

 परिसंवादात सूर : चुकीच्या बाबींना सर्मथन नको, सुधारणा करण्याची गरज

धुळे : माध्यमांतून विचारांची सांगड रुजविण्यासाठी चळवळींनी पुढे यावे. विचारधारा आणि मूल्ये यांच्यात तडजोड करून चालणार नाही. यात विकास हवा, शोषण नाही, असा सूर परिसंवादातून उमटला. 'साम्ययोग साधने'च्या हीरक महोत्सवानिमित्त अग्रवाल विश्राम भवनात 'परिवर्तनवादी पत्रिकांचा संघ-समूह, कसा बनू - चालू शकतो' या विषयावर परिसंवाद झाला. पुण्याच्या सुनीती सु. र., यमाजी मालकर, रमेश ओझा, तर अध्यक्षस्थानी पुण्याच्या सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ उपस्थित होत्या. मालकर म्हणाले, पुरोगामी विचारांना आजही मान्यता आहे. परिवर्तनवादी विचार हे पत्रिकांच्या माध्यमातून मांडले जावेत. ओझा म्हणाले, समाज परिवर्तन आणि व्यवस्थेच्या बदलासाठी पत्रकारिता करावी लागेल व त्यात गांभीर्याचा अभाव दिसतो. तसेच काही पथ्ये पाळावी लागणार आहेत. सुनीती सु. र. म्हणाल्या, विचारधारा व मूल्य यांच्यात तडजोड करून चालणार नाही. चळवळींमध्ये संवाद होणे महत्त्वाचे आहे. माजी राज्यमंत्री डॉ.हेमंत देशमुख, सुगंध बरंठ, किरण सक्सेना, माजी आमदार पी.डी. दलाल, डॉ.मु.ब. शहा, रमेश दाणे, श्रावण शिंदे, विलास चव्हाण, पापालाल पवार आदी उपस्थित होते. जागतिकीकरणामुळे जुनी मूल्य-व्यवस्था मागे पडत आहे. आज पैशालाच अधिक महत्त्व दिले जात आहे. सर्वत्र प्रबोधनापेक्षा मनोरंजनावर अधिक लक्ष दिले जात आहे. चुकांचे सर्मथन करण्यापेक्षा ते सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. माणूसपण, माणुसकी याकडे लक्ष देण्याची गरज आहे, अशी भूमिका विद्या बाळ यांनी स्पष्ट केली.