जिल्ह्यात महात्मा फुले योजनेत म्युकरमायकोसीसवर मोफत उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:17 IST2021-05-26T04:17:12+5:302021-05-26T04:17:12+5:30

जळगाव : महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत ९९६ प्रकारच्या पद्धतींवर उपचार केले जातात. शासनाने या योजनेची व्याप्ती ...

Free treatment for mucomycosis under Mahatma Phule scheme in the district | जिल्ह्यात महात्मा फुले योजनेत म्युकरमायकोसीसवर मोफत उपचार

जिल्ह्यात महात्मा फुले योजनेत म्युकरमायकोसीसवर मोफत उपचार

जळगाव : महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत ९९६ प्रकारच्या पद्धतींवर उपचार केले जातात. शासनाने या योजनेची व्याप्ती वाढवून आता पिवळे व केशरी रेशन कार्डधारकांसोबत मर्यादित कालावधीसाठी पांढरे रेशन कार्डधारकांसाठी ही योजना लागू केली आहे. या योजनेत आता म्युकरमायकोसिस या आजारावरील उपचार मोफत केले जाणार आहेत.

या योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात मागील वर्षात कोविड १९ च्या ४ हजार १९ आणि नॉन कोविडच्या २० हजार २९ रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. म्युकरमायकोसीसच्या उपचारांकरिता शासनाने महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत सर्जिकल पॅकेजेस ११ व मेडिकल पॅकेजेस ८ मध्ये उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

म्युकरमायकोसिस या आजारासाठी विमा संरक्षणापेक्षा अधिकचा खर्च आल्यास राज्य आरोग्य हमी सोसायटीकडून हमी तत्वावर अधिकचा खर्च भागविण्यात येणार असल्याचे जिल्हा समन्वयक डॉ.गोपाल जोशी यांनी सांगितले आहे.

Web Title: Free treatment for mucomycosis under Mahatma Phule scheme in the district