शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

वरणगाव येथे सुरक्षा रक्षकाकडून बंदुकीची गोळी सुटल्याने चार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 15:41 IST

सेंट्रल बँकेच्या शाखेतील घटना : सुरक्षा रक्षक ताब्यात

वरणगाव, ता. भुसावळ : सेंट्रल बँकेच्या वरणगाव -शाखेतील सुरक्षा रक्षकाकडून बॅँकेत ड्यूटी बजावत असताना अनावधानाने बंदुकीचे ट्रीगर दाबला गेल्याने गोळी सुटून त्यात तीन महिलांसह एक इसम किरकोळ जखमी झाले. मंगळवारी दुपारी १.३० ते १.४५ वाजेच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. जखमींवर तातडीने खाजगी तसेच ग्रामीण रूग्णालयात उपचार करण्यात आले.या संदर्भात वृत्त असे की, सेंट्रल बॅँकेचा सुरक्षा गार्ड लखीचंद चौधरी, रा. तापी नगर भुसावळ हा नेहमीप्रमाणे बॅँकेजवळ ड्यूटी बजावत होता. यावेळी बॅँकेत ग्राहकांची बरीच गर्दी होती. ग्राहक बाहेरील खुर्च्यांवर बसले होते. दुपारी १.३० ते १.४५ वाजेच्या दरम्यान सुरक्षा रक्षकाने भिंतीला लटकविलेली बंदुक काढत असताना अनावधानाने बंदुकीचा ट्रीगर दाबला जाऊन बंदुकीतून गोळी सुटली यामुळे बॅँकेच्या रांगेत बसलेले प्रमिला वंसत लोहार (रा. तळवेल), शोभा प्रकाश माळी (रा. वरणगाव) , राधेशाम छबिलदास जैसवाल (रा. वरणगाव ) , कलाबाई चौधरी , (रा. वरणगाव) यांच्या पायाला गोळी लागल्याने ते जखमी झाले. त्याच्यावर खाजगी तसेच ग्रामिण रुग्णालयात उपचार सुरू आहे. सुरक्षा रक्षक हा सैन्यदलातील निवृत्त कर्मचारी असल्याचे समजते.घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक संदिपकुमार बोरसे, हे.कॉ. सुनील वाणी, गणेश शेळके, राहूल येवले व अन्य कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन सुरक्षा रक्षक लखीचंद चौधरी यांना ताब्यात घेतले. या प्रकारानंतर घटनास्थळी एकच गर्दी उसळली होती. तसेच बॅँक कर्मचाऱ्यांचीही बरीच धावपळ झाली.