आगीमध्ये चार शेळ्यांचा होरपळून मृत्यू

By Admin | Updated: April 17, 2017 17:39 IST2017-04-17T17:39:33+5:302017-04-17T17:39:33+5:30

60 ते 70 हजार रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे

Four goats escaped in the fire | आगीमध्ये चार शेळ्यांचा होरपळून मृत्यू

आगीमध्ये चार शेळ्यांचा होरपळून मृत्यू

भडगाव,  जि. जळगाव, दि. 17 -  तालुक्यातील  पिंपळगाव बद्रुक जवळ गिरणा नदी काठावरील खळ्यास अचानक आग लागून  चारा, शेती अवजारे, झोपडय़ा जळून खाक होण्यासह चार शेळ्यांचा होरपळून मृत्यू झाला.  60 ते 70 हजार रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
आग लागताच  गावक:यांनी घटनास्थळी धाव घेतली व आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.   भडगाव न.पा.च्या अग्नीशमन बंबाने पाण्याचा मारा करून आग विझविण्यात आली. या आगीत बाबूसिंग सहादू परदेशी यांच्या मालकिच्या चार शेळ्यांचा होरपळून मृत्यू झाला तर चारा, झोपडी जळून खाक झाली. तसेच खळ्यालगतच्या विजय हिलाल पाटील, जयराम चिंतामण ठाकरे, सुकलाल लोटन परदेशी यांच्या खळ्यातील चारा, शेती अवजारे जळाली. 

Web Title: Four goats escaped in the fire