शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

एफडीएच्या १६ डेअरींवर धाडी

By admin | Updated: November 20, 2014 13:29 IST

अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता विभागाच्या मुंबई, ठाणे आणि औरंगाबादच्या अधिकार्‍यांचा समावेश असलेल्या पथकांनी मंगळवारी आणि बुधवारी जिल्हा सहकारी दूध संघासह १६ डेअरींवर धाडी टाकल्या.

जळगाव : अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता विभागाच्या मुंबई, ठाणे आणि औरंगाबादच्या अधिकार्‍यांचा समावेश असलेल्या पथकांनी मंगळवारी आणि बुधवारी जिल्हा सहकारी दूध संघासह १६ डेअरींवर धाडी टाकल्या. यामध्ये ३ लाख ५९ हजार ९४0 रुपये किमतीचे ११ हजार ९९८ लीटर दूध आणि १0 लाख ८५ हजार ३७0 रुपये किमतीची ३ हजार ७५७ किलो स्कीम मिल्क पावडर जप्त करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त बी.यू. पाटील यांनी दिली.
दक्षता विभागाचे सहआयुक्त डी.एन.फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त ए.यू. केरूरे यांच्यासह १९ जणांच्या पथकांनी एकत्रितरीत्या जळगाव जिल्हा सहकारी दूध संघ, बॉम्बे नागोरी मिल्क को-ऑप. सोसायटी या शहरातील संस्थासह पाचोरा, पारोळा, भडगाव, वरणगाव, भुसावळ व चाळीसगाव येथील १६ डेअरींवर सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत धाडी टाकल्या. मंगळवारी १५, तर बुधवारी पाचोर्‍याच्या सुशील डेअरीवर धाड टाकण्यात आली. मात्र भुसावळ येथील अमृतधारा डेअरी बंद असल्याचे आढळून आले. जिल्हा दूध संघातून क्रीम मिल्क, शक्ती पाश्‍चराईज्ड मिल्क, टोन् मिल्क, म्हशीच्या दुधाचे चार नमुने घेण्यात आले आहेत.
 
या डेअरींवर टाकल्या धाडी
जळगाव जिल्हा सहकारी दूध संघ, सर्मथ डेअरी (भडगाव), निकेत चिलिंग सेंटर (वरणगाव), भारत डेअरी (पाचोरा), श्रीकृष्ण डेअरी (पाचोरा), श्रीकृष्ण डेअरी (पारोळा), शीतल डेअरी (पारोळा), गणेश (दर्शन डेअरी, चाळीसगाव), बॉम्बे नागोरी मिल्क को-ऑप. सोसायटी (जळगाव), अमर डेअरी (बोदवड), मंगलमूर्ती डेअरी (चाळीसगाव), अपेक्षा डेअरी (चाळीसगाव), हेमराज डेअरी (चाळीसगाव), ममता डेअरी (चाळीसगाव), सुशील डेअरी (भडगाव), अमृतधारा डेअरी (भुसावळ). 
 
येथे केली कारवाई 
गणेश (दर्शन डेअरी) चाळीसगाव
९0 हजार रुपये किमतीचा ३ हजार लीटर मिक्स दूधसाठा, ३ लाख १४ हजार ७९0 रुपये किमतीची १ हजार ४९९ किलो स्कीम मिल्क पावडर, १ लाख ३६ हजार ४00 रुपये किमतीचा स्कीम मिल्कसाठा जप्त केला.
बॉम्बे नागोरी मिल्क को-ऑप. सोसायटी, जळगाव - २ लाख ६९ हजार ९४0 रुपये किमतीचे ८ हजार ९९८ लीटर दूध, तसेच २ लाख ९९ हजार ४00 रुपये किमतीची ९९८ किलो स्कीम मिल्क पावडर जप्त करण्यात आली. 
मंगलमूर्ती डेअरी, चाळीसगाव-२ लाख ८0 हजार ५0 रुपये किमतीची ५६५ किलो स्कीम मिल्क पावडर जप्त.
अपेक्षा डेअरी, चाळीसगाव - ५४ हजार ७३0 रुपयांची १९९ किलो स्कीम मिल्क पावडर
हेमराज डेअरी, चाळीसगाव - ३ लाख ५९ हजार ९४0 रुपये किमतीचे ११ हजार ९९८ लीटर दूध आणि १0 लाख ८५ हजार ३७0 रुपयांची ३ हजार ७५७ किलो दूध पावडर.
------------
१६ डेअरींवर टाकण्यात आलेल्या धाडीमध्ये पथकांनी गायीचे-म्हशीचे दूध, प्रमाणित दूध, मिक्स मिल्क, स्कीम मिल्क पावडर, टोन् मिल्क आदींचे २६ नमुने घेतले आहेत.
नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. विविध डेअरींमध्ये आढळून आलेले भेसळीचे ११ हजार ९९८ लीटर दूध घटनास्थळीच नष्ट केले असून ७ हजार ७५७ किलो स्कीम मिल्क पावडर जप्त केली आहे.
-------------
प्रथमदर्शनी करण्यात आलेल्या तपासणीमध्ये मिक्स, गायीच्या व म्हशीच्या दुधामध्ये स्कीम मिल्क पावडरची भेसळ करण्यात आली असल्याचे आढळून आले आहे. भेसळ करणार्‍या डेअरींचे परवाने रद्द, निलबित करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. अहवाल आल्यानंतर कारवाईबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त बी.यू.पाटील यांनी सांगितले.