Farmers in the wind due to government policies | सरकारच्या धोरणांमुळे हवालदील झालेला शेतकरी वाऱ्यावर
सरकारच्या धोरणांमुळे हवालदील झालेला शेतकरी वाऱ्यावर

जळगाव- परतीच्या पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान होवून शेतकरी अक्षरक्ष: उध्द्वस्त झाला आहे. एवढेच नव्हे तर गेल्या पाच वर्षात भाजप सरकारच्या धोरणामुळे हवालदिल झालेला शेतकरी वर्ग वा-यावर असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला़ तर शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेवून नुकसानीची पाहणी करण्यासाठी जळगाव गामीण मतदारसंघात बुधवारपासून दौरा करणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली़

विमा कंपन्यांकडून शेतकºयांची लुबाडणुक
देवकर यांनी सांगितले की, आक्टोंबर महीन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होवू शेतकरी पूर्णपणे उध्दवस्त झाला आहे. त्यामुळे शेतकºयाला नुकसान भरपाई म्हणून ५० हजार रुपये हेक्टरी मिळावे अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे. तसेच एकीकडे शेतकºयाच्या पिकांचे पूर्ण नुकसान झाले असतांना पिक विम्याचे हप्ते भरुन देखील ९५ टक्के शेतकºयांना भरपाई मिळत नाही. शासनाच्या दुर्लक्षामुळे विमा कंपन्यांकडून शेतकºयांची लुबाडणुक झाली आहे. सरकारसह कुणीच दखल घेत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

खोटी आश्वासन देवून तोंडाला पाने पुसली
शासनाकडून कर्जमाफी जाही केली़ मात्र, अजूहनही ५० टक्के शेतकºयांना त्याचा लाभ मिळालेला नाही़ त्यातच आता पुन्हा अतिवृष्टीने अस्मानी संकट आल्याने शासनाने शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी देखील गुलाबराव देवकर यांनी पत्रकार परिषदेत केली. भाजप सरकारने गेल्या पाच वर्षात खोटी आश्वासने देवून फसवणूक करीत शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसली आहे, असा आरोपही त्यांनी केला़ तर मुख्यमंत्री यांनी कर्जमाफी करता येणार नाही असे जाहीर केला विरोधकांच्या तसेच शेतकºयांच्या आंदोलनानतंर कर्जमाफी जाहीर केली. मात्र, ती देखील पर्ू्णपणे दिली नसल्याचा आरोपही देवकर यांनी केला.

बांधावर जावून पाहणी करणार
उद्धवस्त झालेल्या शेतकºयांच्या नुकसानीची पाहणी करण्याचा दौरा सर्वप्रथम राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. त्यानतंर मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांना पाहणी करण्याची जाग आल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, बुधवारपासून जळगाव तालुका व धरणगाव तालुक्यातील शेतकºयाच्या नुकसानीची पाहणी बांधावर जावून करून त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी घेण्यासाठी दौरा करणार असल्याची माहीतीही गुलाबराव देवकर यांनी दिली. बुधवारी सकाळी ८़३० वाजेपासून दौºयाला सुरूवात करणार असल्याचेही त्यांनी सांगितले़

 

Web Title: Farmers in the wind due to government policies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.